Breaking News

"आत्मनिर्भर"योजनेचा छोट्या व्यवसायिकांनी लाभ घ्यावा-नगरध्यक्षा संगिता विटकरके. के. निकाळजे । आष्टी 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोट छोट्या व्यवसायिकांसाठी व त्यांना प्रोहत्सान देण्यासाठी "आत्मनिर्भर भारत" योजना सुरू केली असून,मा.आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व छोट्या व्यावसायिकांनी उद्या दि.5 व 6 रोजी सकाळी नऊ ते पाच पर्यंत अर्ज दाखल करून या योजनेचा लाभ घेण्याचे अहवान आष्टीच्या नगराध्यक्षा संगिता विटकर यांनी केले आहे.


           जगदंबा सेवाभावी संस्था व आष्टी नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मा.आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे प्रधानमंञी मा. नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या छोटछोट्या व्यावसायिकांना उभारी देण्याकरिता खेळते भांडवल मिळविण्यासाठी "आत्मनिर्भर"योजना सुरू केली आहे.या योजनेतून शहरातील छोट्या व्यावसायिकांना दहा हजार रुपये कमी व्याजदरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच या योजनेत व्यवस्थित कर्ज फेड केली तर त्याला मोठ्या कर्जाची हमी सुध्दा नगर पंचायत घेणार आहे.तरी शहरातील सर्व फेरीवाले, ठेकेवाले, भाजीपाला विक्रेते, केशकर्तानलाय,चर्मकार,स्टेशनरी यासह सर्व छोट्या व्यावसायिकांनी आपला अर्ज उद्या दि.5 व 6 रोजी सकाळी 9 ते सांयकाळी 5 पर्यंत जमा करण्याचे अहवानही विटकर यांनी केले आहे.No comments