धारूर युथक्लबने राबवले श्रीक्षेत्र अंबाचोंडी येथे दोन दिवसीय स्वच्छता अभियान.
जगदीश गोरे । धारूर
धारूर तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी सामाजिक संस्था किल्ले धारुर युथ क्लबने श्रीक्षेत्र अंबाचोंडी येथे दोन दिवसीय स्वच्छता अभियान राबवले.
धारूर शहरालगतच्या डोंगर कुशीत वसलेले श्रीक्षेत्र अंबाचोडी माता हे जागृत देवस्थान आहे .दरवर्षी नवरात्रात या ठिकाणी देवीची नऊ दिवस यात्रा असते .कोरोना कालावधीत लोकांची गर्दी कमी असली तरी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक व भावीक भक्त येत आहेत.
शनिवार पासून सुरू होणाऱ्या या नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धारूर युथक्लब या सामाजिक संघटनेने श्रीक्षेत्र अंबाचोडी येथे 16 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोंबर या दोन दिवशी स्वच्छता अभियान राबवले. 16 ऑक्टोबर ला राबवलेल्या स्वच्छता अभियानात नदीमधील काही भाग स्वच्छ करण्याचा राहिला होता, तर सकाळी स्नान करण्यास जाणाऱ्याची पायवाट गवताने नाहिशी झाली होती ती पायवाट मोकळी करण्याचे कार्य केले तसेच मंदीर परीसरामध्येही स्वच्छता करण्यात आली.
अनेक भावीकांनी टाकलेला कचरा , नारळाची टरफले , टाकून दिलेले खाद्यपदार्थचे उरलेले अवशेष गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली .तसेच मंदीरासमोर असलेल्या नदीच्या भागातील मोठया प्रमाणातील निरुपयोगी गवत काढण्यात आले यासाठी धारूर युथ क्लबच्या सदस्या सोबत सकाळी स्नान करण्यास आलेल्या भाविकांनीही मदत केली. श्रीक्षेत्र अंबाचोंडी माता मंदीर परीसर स्वच्छ झाल्यामुळे मंदीराचे पुजारी शंकर गुरव यानीही त्यांच्या मुलासोबत या स्वच्छता अभियानात भाग घेतला व समाधान व्यक्त केले .
No comments