Breaking News

पीक नुकसानीतून परळी तालुका वगळला : तालुक्याचा समावेश करण्याची शेतकरी संघटनेची मागणीपरळी वैजनाथ : शासनाच्या वतीने अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या मदतीतून परळी तालुका वगळण्यात आल्याने तालुका समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री, तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  येत्या चार दिवसात यावर योग्य कार्यवाही करून तालूक्यातील शेतकऱ्यांना शासनाची  मदत मिळावी, अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेवुन आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे अँड राहूल  सोळंके, कैलास  सोळंके, संजय डिघोळे, लक्ष्मण अघाव, जगन्नाथ आंधळे, गोविंद मुंडे  दादा घुमरे, मोहन सोळंके उपस्थित होते.


No comments