Breaking News

नेटवर्क नसल्याने परळी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक त्रस्तपरळी : मोबाईल सिमकार्ड कंपन्यांवर परळी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचा चांगलाच संताप व्यक्त होत आहे. नेटवर्क फुल इन्कमिंग आऊट गोईंग गुल झाल्याने हॅलो.. हॅलो.. हॅलो आवाज येत नाही. तर काही कंपन्यांचे सिमकार्ड चक्क बंद झाल्याने नागरिकांना संभाषण करण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे. या कंपन्या विरोधात नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दोन-तीन दिवसापासून आयडीया, व्होडाफोन आदी कंपनीचे नेटवर्क सतत गायब होताना दिसत आहे.

कोरोना काळामुळे अद्यापिही शाळा, कॉलेज सुरू झाले नाहीत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्याचे सरकारकडून आदेश काढण्यात आलेला आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने नुकत्याच पदवी परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे.  तर ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना स्मार्टफोनद्वारे शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मात्र ग्रामीण भागातील नेटवर्क नेहमी लपंडाव करत असल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तर दुसरीकडे खाली सुरु होत असलेल्या पदवीच्या परीक्षा या नेटवर्क डिस्कनेक्टींगमुळे याचा मोठा फटका परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बसत आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस 3 जी आणि 4जी सेवेच्या नावाखाली सिमकार्ड धारक कंपन्या  इंटरनेट प्लॅन मोबाईल धारकांना देत आहे. मात्र सुविधा देण्यास कमी पडत असल्याने या माध्यमातून सिम कार्ड धारकांची कंपन्यांकडून फसवणूक होत असल्याचे दिसत आहे. तशा प्रकारच्या तक्रारी अनेक विध्यार्थी व पालकातून होत आहेत.

वोडाफोन, आयडिया, आदी कंपनी यांचे नेटवर्क गुल होत  आहे. जर नेटवर्क आलेच तर स्पीड अत्यंत कमी असले प्रकार सुरु आहेत. कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे  ऑनलाईन सुविधा देणाऱ्या मल्टीसर्व्हिसवाल्यांना ही मोठा आर्थिक फटका बसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मोठं मोठी रिचार्ज करून इंटरनेट सेवा संबंधित कंपन्यांकडून मिळत नसेल तर लोकांचा डेटा जशाच्या तसाच वापस कंपनीला जात आहे. यातून कंपन्यांचा फायदा अन मोबाईल धारकांना नाहक आर्थिक फटका सहन करण्याची वेळ आली आहे. यामुळे मोबाईलधारकांसह पालक वर्गामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. फास्ट सेवा देण्याचा दावा करणाऱ्या कंपन्या आशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करून लूट करत असतील तर या फसव्या कंपन्यांना विरोधात सरकार काही कारवाई करेल काय हाच खरा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. 


No comments