Breaking News

तांत्रिक अडचणींमुळे पदवी व पदवीत्तर परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार पुन्हा संधी


शिवसंग्रामच्या अक्षय मानेंशी बोलताना बामू परीक्षा विभाग संचालकांनी दिली माहिती


बीड : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदवीत्तर, इतर परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. यामध्ये ऑनलाईनमध्ये लॉगिन, पीआरएन क्रमांक समस्या, इनव्हॅलिड पासवर्ड, वेब कॅमेरा तांत्रिक समस्या, एरर मॅसेज आदी बाबतीत तर ऑफलाईन मध्ये विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिकाच न पोहोचणे आदी समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. विद्यापीठाने प्रत्येक अडचणीची व समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन केलेली होती. मात्र या समितीचा समन्वय विद्यार्थ्यांशी न जुळल्याने तांत्रिक अडचणी येऊन कित्येक विद्यार्थ्यांचे पेपर बाकी राहिले होते.

  याबाबत बीड जिल्ह्यात विद्यार्थी आघाडीच्या हेल्पलाइनला विद्यार्थ्यांनी हि बाब दाखवून देत मदत मागितली होती. शिवसंग्रामच्या वतीने  विद्यार्थ्यांच्या बऱ्याच समस्या सोडविल्या गेल्या होत्या मात्र ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे पेपरच देता आले नाही, त्यांच्याबाबत विद्यापीठाकडून काय करण्यात येत आहे, याबाबत विचारणा करत शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अक्षय माने यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभाग संचालकांना संपर्क केला. यावेळी त्यांनी आपण फीडबॅकद्वारे माहिती पाठवा, त्यानंतर तांत्रिक अडचणीत सुधारणा करून दोन्ही पद्धतीने परीक्षा दिलेल्या व पेपर न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय घेत असल्याचे कळवले आहे.    


No comments