Breaking News

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह पडझडीत पडलेल्या घरासाठी सरकारने भरीव मदत द्यावी -किशन तांगडे

 


निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत  यांची भेट घेऊन तांगडे यांनी त्यांच्या माध्यमातून सरकारला केली मागणी

बीड :  अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके पूर्णतः वाया गेली असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात गोरगरिबांची घरे पडली आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार व अतिवृष्टीने बेघर झालेल्या गोरगरिबांना शासनाने आर्थिक मदत तत्काळ करावी, अशी मागणी रिपाइंचे बीड तालुकाध्यक्ष किशन तांगडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या माध्यमातून सरकारला केली. 

समाज हिताचा व्यापक दृष्टिकोन असलेले रिपाइंचे बीड तालुकाध्यक्ष किशन तांगडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राऊत यांची शनिवारी भेट घेऊन बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी संदर्भात चर्चा केली. 

महाराष्ट्रासह संपूर्ण बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसा पासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.  यामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजा हाताशी आलेले पीक गेल्या मुळे संपूर्णपणे खचून गेला आहे. तसेच ग्रामीण भागात गोर-गरीबांच्या घरांची देखील खूप प्रमाणात पडझड झाली असून त्यामुळे शेतीचे आणि पडलेल्या घरांचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या यंत्रणेस विनाविलंब तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यास प्रती हेक्टर एक लाख रुपये,(गायरान धारकासह) गोर-गरीबांच्या पडलेल्या घरासाठी दिड लाख रुपये, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि हातावर पोट असणाऱ्या गोर-गरीबांना प्रती व्यक्ती दहा हजार रुपये घोषित करून ते ताबडतोब त्यांना देण्यात यावेत, अशी मागणी तांगडे यांनी यावेळी केली. 

तसेच हा विषय सरकारने गांभीर्याने घेतला नाही तर रिपाईचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पुजी कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही रिपाईचे बीड तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांनी दिला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी  राऊत म्हणाले की,  आमच्या पातळीवर जेवढे सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले.  


No comments