Breaking News

माझ्या ऊसतोड कामगारांच्या जीवाशी खेळू नका; त्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडाल तर याद राखा - आ विनायक मेटे

 मुंबईवरून थेट ढेकणमोह्यात मयत ऊसतोड कामगाराच्या अंत्यविधीस आ मेटे पोहोचले

शिवसंग्रामप्रणित ऊसतोड संघटनेच्या अध्यक्ष बबनराव माने साताऱ्यात जाऊन जखमींची काळजी वाहत आहेत !

बन्सड कुटुंबीय व जखमींना कारखान्याकडून मदत मिळवून देणार - आ मेटे  


बीड : हजारो कोटी रुपये अनुदानापोटी राज्य सरकार साखर कारखान्याला देते, मात्र ५ पैसे सुद्धा आमच्या ऊसतोड कामगारांना देत नाही, जो वर्ग सर्वात जास्त मेहनत घेतो त्या आमच्या कामगारांना कसलाही न्याय दिला जात नाही, काल पवार साहेबांच्या उपस्थितीत झालेला निर्णय आम्हाला मान्य नाही, त्याच्या विरुद्ध आम्ही योग्य ठिकाणी दाद मागणार आहेत, साखर कारखानदारांनी ऊसतोड कामगारांच्या जीवाची किंमत क्षुल्लक ठरवू नये, अपघातात मयत झालेल्या शोभाताई बन्सड यांना मदत मिळवून दिल्याशिवाय शिवसंग्राम राहणार नाही, असे आ विनायक मेटे यांनी ढेकणमोहा येथे अंत्यविधीस उपस्थितीस असताना केलेल्या सांत्वनात म्हंटले. यावेळी त्यांनी बन्सड कुटुंबियांना धीर देत शिवसंग्राम सोबत असल्याचा आधारही दिला. माझ्या ऊसतोड कामगारांच्या जीवाशी खेळू नका; त्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडाल तर याद राखा असेही राज्य सरकारला त्यांनी यावेळी ठणकावले आहे.
       

शिवसंग्रामप्रणित ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार संघटना जखमींच्या मदतीला थेट अपघात ठिकाण असलेल्या दहीवडी येथे पोहोचली असून अध्यक्ष बबनराव माने हे त्या जखमी अपघातग्रस्तांची काळजी घेत आहेत. परवा रात्री बीड तालुक्यातील ढेक्कणमोह येथील ऊसतोड कामगार कृष्णा सहकारी साखर कारखाना (लि.रेटरा)कराड येथे पंढरपूर सातारा रोडने जात असताना दहिवडी परिसरात जि.सातारा येथे अपघात झाला आहे व एक कामगार महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर बाकी चार जण अत्यंत गंभीर असून दहिवडी येथील चारुशिला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आ विनायक मेटे यांनी स्वतः ढेकनमोहा येथे जाऊन मयत महिला ऊसतोड कामगाराच्या अत्यंविधिस उपस्थित राहिले.  यामधील दोन रुग्ण अत्यंत गंभीर जखमी असल्याने त्यांना पंढरपूर येथे हलवत येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने यांनी दिली आहे.  
      

ऊसतोड कामगार टोळी मुकादम साखर कारखाना परिसरातील असून सध्या तो फरार आहे, कारखानदार शेतकरी अधिकारी व मजुर भरती अधिकारी सगळे शांत आहेत, कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. शिवसंग्रामप्रणित महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष मा. बबनराव माने  रुग्णालयात स्वतः उपस्थित राहून सर्व जबाबदारी पार पाडत आहेत. आ विनायक मेटे यांनी सरकारवर आरोप करत ऊसतोड कामगारांची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप थेट अंत्यविधीस उपस्थित राहून केला. माझा ऊसतोड कामगाराचा जीव क्षुल्लक समजण्याचे पाप कारखानदारांनी करू नये असे आ विनायक मेटे यांनी म्हंटले आहे.No comments