Breaking News

साळेगाव खून प्रकरणाला वेगळ वळण : अनैतिक संबंधातून दोघांनी केला खून : आरोपी पोलिसांच्या ताब्यात !गौतम बचुटे । केज 

तालुक्यातील साळेगाव येथे शेतात कापूस वेचणाऱ्या २४ वर्षीय महिलेचा गळा आवळून व डोक्यात दगड मारून खून केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती; परंतु पोलिसांनी अवघ्या काही तासात या खुनातील आरोपींना ताब्यात घेतले. सदर खून हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मयत आश्विनी इंगळे 


या बाबतची माहिती अशी की, साळेगाव येथील    या महिलेचा दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३०  दरम्यान एका २४ वर्षीय विवाहित महिलेचा शेतात कापूस वेचताना कोणीतरी अज्ञात इसमाने गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला होता. यामुळे जिल्ह्यात  प्रचंड खळबळ माजली होती. त्यामुळे परिसरतार भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता; महिलेचा मोबाईल त्यांना आढळून आला. त्या आधारे त्यांनी तपासणी केली असता त्यांना पंकज भगवान जाधव याच्याशी पहाटे संपर्क झाल्याचे निदर्शनास आले. 

त्या आधारे अधिक तपास केला असता प्राप्त माहिती अशी की, सदर महिला हे शेतात गेली असता तिच्याशी पंकज भगवान जाधव याने शरीर संबंध केला. त्या नंतर त्याने त्याचा मित्र धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे यास फोन करून बोलावून घेतले. त्यानेही ही सदर मयत महिलेशी शरीर सुखाची मागणी केली; मात्र त्या महिलेने नकार दिला आणि तिने हा प्रकार तिच्या पतीस सांगते व पोलिसात तक्रार देते; अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी तिच्या हातातील मोबाईल हातावर मारून हिसकावून घेतला. नंतर धनंजय उर्फ अजय दत्ता इंगळे यांनीही तिला ओढत नेऊन कापसाच्या शेतात तिच्यावर बलात्कार केला. 

त्या नंतर हा प्रकार घरी माहित होईल किंवा पोलिसात तक्रार होईल; म्हणून दोघांनी मिळून त्या महिलेचा स्कार्फने गळा आवळून आणि नंतर डोक्यात दगड घालून खून केला. खून केल्या नंतर दोघांनी प्रेत उचलून  सुमारे पन्नास फूट अंतरावर कापसाच्या पिकात नेऊन टाकले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील साहेव, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस उपनिरक्षक दादासाहेब सिद्धे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तपासणी पथक, आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच लातूर येथील श्वान पथकाही पाचारण करण्यात आले होते.

या प्रकरणी केज पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे करीत आहेत. तसेच मयत महिला ही आरोपीना पैशासाठी ब्लॅकमेल करीत असल्यामुळे रागातून आरोपीना संगनमताने तिचा खून केला असल्याची चर्चा आहे.  

आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होई पर्यंत अंत्यविधी न करण्याचा नातेवाईकांचा निर्णय :- दरम्यान आरोपी ताब्यात घेतल्या शिवाय आम्ही अंत्यविधी करणार नाही. अशी भूमिका दि. ३१ ऑक्‍टोबर रोजी मयताच्या नातेवाईकांनी घेतल्यामुळे अंत्यविधी उशिरा करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे समजते.

 स्थानिक गुन्हे शाखेची महत्वपूर्ण कामगिरी :-  स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुप्त खबरे व अत्यंत गोपनीय पद्धतीने माहिती काढून यातील आरोपी धनंजय उर्फ अजय इंगळे आणि पंकज जाधव यास ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही महिला पंकज जाधव यांच्या शेतात मजुरी देखील करीत असे. तसेच दोघेही मयत महिलेचे नातेवाईक आहेत.

 

No comments