Breaking News

बाजार भरला शेतकरी व्यापारी आनंदले...!

सात महिन्या नंतर भरला साळेगावचा आठवडी बाजार गौतम बचुटे । केज  

तालुक्यातील साळेगाव येथील आठवडी बाजार सात महिन्या नंतर भरला आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या आदेशा नुसार केज तालुक्यातील साळेगाव येथे दर गुरुवारी भरणारा आठवडी बाजार पुन्हा भरला आहे. बाजारात शाकाहारी व मांसाहारी खानावळी, चहा व फराळाचे हॉटेल्स, जनावरांच्या सजावटीची दुकाने तसेच जनावरांचे खाद्य व इतर सेवा देणारी दुकाने सजली आहेत. मार्च ते ऑक्टोबर या साथरोगाच्या कालावधीत तब्बल सात महिने बाजार बंद होता. 

त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात शेतकरी व व्यापारी यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले. परंतु आता सर्व सुरळीत होत आहे. बाजार तळावर पूर्वी प्रमाणेच गाई, म्हशी, बैल व शेळ्यांचा बाजार भरवण्यात येणार आहे. परंतु कोव्हीड-१९ या साथरोगाची सर्वांनी काळजी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी नियमांचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन सरपंच कैलास जाधव पाटील, उपसरपंच श्रीमंत गित्ते आणि ग्रामसेवक दत्तात्रय गव्हाणे यांनी केले आहे.


No comments