Breaking News

सर्व्हर डाॕऊन : मंडळ आधिकारी तलाठ्यांनी डिजिटल सह्या केल्या तहसिलदाराकडे सुपुर्द ; मंडळ अधिकारी व तलाठी संघटनेचा निर्णय !बाळासाहेब आडागळे ।  माजलगाव 

सततच्या सर्व्हर डाऊन मुळे ई फेरफार व सातबारा उतारे मिळण्यास होत आसलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कोणतेही आॕनलाईन शेतीची कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याने सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांनी सामुहिक रित्या डिजिटल सह्या तहसिलदार वैशाली पाटील यांच्या कडे सुपुर्द केल्या आहेत.

      

शासनाने महसुल विभागाच्या सर्वच बाबी आॕनलाईन केल्या आसुन यात तलाठी यांच्या कडील ७/१२ व ८ अ सह अन्य प्रमाण पञे आॕनलाईननेच मिळत आसल्याने या साठी त्या त्या तलाठी , मंडळ अधिकारी यांच्या डिजिटल स्वाक्षरी तयार करुन कामकाज सुरु होत.माञ मागिल काही दिवसा पासुन या प्रक्रियेसाठी आसणारे सर्व्हर सतत डाऊन होत आसल्याने कामकाजा साठी मोठा आडथळा निर्माण होत आसल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या आडचणी निर्माण होवुन तलाठी , मंडळ अधिकारी यांना ईतर कामा बरोबरच मोठा तान निर्माण होत. आसल्याने व एकी कडे ई.फेरफार विलंबना बाबत पाचशे रुपये दंड करणे या सततच्या सर्व्हर डाऊन बाबत जिल्हाधिकारी , तहसिलदार यांना कळवुन देखील सर्व्हरसाठी लागणारी ईंटरनेटची स्पीड मध्ये वाढच होत नसल्याने शेवटी तलाठी   मंडळ आधिकारी यांनी आपआपल्या डिजिटल स्वाक्षरीच तलाठी संघटनेच्या निवेदना सह तहसिलदार वैशाली पाटील यांच्या कडे सुपुर्द केल्या आहेत.

या तलाठी संघटनेचे अध्यक्ष रुपचंद आभारे ,मंडळ अधिकारी पद्माकर मुळाटे,सचिव शिलवंत , तलाठी ईंगळे सह अन्य संघटनेचे तलाठी उपस्थित होते.दिलेल्या निवेदनावर तालुक्यातील जवळपास २० मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या स्वाक्षरी आहेत 

शेतकऱ्याची कामे खोळंबली 

 

महसुलचे कोणतेही काम आॕनलाईन आसल्याने ७/१२ व ८ अ सह फेरफार हे सर्व शासनाच्या विविध योजनेसाठी लागत आसल्याने सततच्या सर्व्हर डाऊन मुळे मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या कामाचा खोळंबा होणार आहे.तरी या सर्व्हरला लागणारी ईंटरनेटचीस्पिड वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडुन केली जात आहे.

 

फेरफार घेतांना विलंब झाला की ५००रुपये दंड आकारणी केली आहे.या मुळे सततच्या सर्व्हर डाऊनमुळे हा विलंब होत आसल्याने हा दंड तलाठी मंडळ अधिकारी यांना परवडण्या सारखा नसल्याने जोपर्यंत ईंटरनेटची आमच्या सर्व्हरला स्पिड येत नाही.तो पर्यंत आम्ही सर्व तलाठी मंडळ अधिकारी आपआपल्या डिजिटल स्वाक्ष-या  तहसिलदार यांच्या कडे दिल्या आहेत, असे तलाठी संघटनेचे अध्यक्ष रुपचंद अभारे म्हणाले. No comments