Breaking News

साखर संघाच्या महत्वपूर्ण बैठकीस महाराष्ट्र ऊसतोड संघटनेच्या वतीने आ विनायक मेटे होणार सहभागी

अध्यक्ष प्रकाश दांडेगावकर यांच्याकडून आले निमंत्रण

बीड :  संपूर्ण राज्यात उसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांना दीडशे टक्के वाढीव भाव मिळावा म्हणून अनेक दिवसांपासून महाराष्ट्र ऊसतोड कामगार, मुकादम संघटना व इतर ऊसतोड मजूर संघटनांनी संप पुकारला आहे. मात्र बीडच्या माजी पालकमंत्र्यांकडून किरकोळ २१ रुपयांची दरवाढी मागणी केली जात असून या मागणीस शिवसंग्रामप्रणित ऊसतोड संघटनेसह इतर सर्व संघटनांनी विरोध दर्शवला असून १५० टक्के दरवाढ व इतर मागण्या मान्य झाल्या पाहिजे याबाबत शिवसंग्रामप्रणित संघटनेसह इतर सर्व संघटना ठाम आहेत. ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदारांच्या दरवाढ प्रश्न व इतर प्रश्नांवर दि २७ ऑक्टोबर २०२० रोजी देशाचे नेते खा. शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत  साखर संघाची बैठक होत आहे.

या बैठकीस ना दिलीप वळसे पाटील, ना जयंत पाटील, ना बाळासाहेब थोरात, ना बाळासाहेब पाटील, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे या बैठकीस उपस्थित असणार आहेत. सदर बैठकीमध्ये दरवाढीच्या निर्णयावर चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे. या बैठकीसाठी शिवसंग्रामप्रणित ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूकदार संघटनेच्या वतीने आ विनायक मेटे यांना साखर संघाचे अध्यक्ष प्रकाश दांडेगावकर यांचे निमंत्रण आले आहे. महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष बबनराव माने पाटील तसेच नामदेवराव गायकवाड, बाबासाहेब गुरसाळी, रमेश राठोड, रतन बेलदार, कदम मुकादम आदींची उपस्थिती असणार आहे. बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असून मागण्या मान्य झाल्यास संपाबाबत निर्णय होऊ शकतो.  

No comments