Breaking News

दिव्यांग कर्मचारी यांना "माझे कुटुंब,माझी जबाबदारी" सर्वेक्षणातून सुट मिळावी - राजेंद्र लाडआष्टी :  शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई ३२ च्या दि.२१ एप्रिल २०२० च्या संदर्भान्वये निघालेल्या शासनाच्या २५ सप्टेंबर २०२० च्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व दिव्यांग कर्मचारी यांना शासकीय कार्यालयात उपस्थितीतून सूट देण्यात आली असून बीड जिल्ह्यात अजूनही पूर्ण क्षमतेने वाहतूक व्यवस्था सुरळीत न झाल्यामुळे दिव्यांग कर्मचारी यांना उपस्थितीतून सूट मिळावी.दिव्यांग कर्मचारी यांची रोग प्रतिकार शक्ती इतरांच्या तुलनेत तितकीशी चांगली नसल्याने व चलनवलनास वेगवेगळ्या अडीअडचणी येत असल्यामुळे कुटुंबाना भेटी दिल्याने कोरोनामुळे दिव्यांग कर्मचारी बाधित होण्याची अधिक दाट शक्यता आहे.

  "माझे कुटुंब,माझी जबाबदारी" कुटुंब सर्वेक्षण या कामातून ५५ वर्षे वयाच्या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने सूट दिली आहे त्याचप्रमाणे दिव्यांग कर्मचारी यांना सुध्दा सुट मिळावी.दिव्यांग कर्मचारी यांची असमर्थता लक्षात घेऊन जनगणना सारख्या महत्वाच्या कामातून यापूर्वीच दिव्यांग कर्मचारी यांना वगळले आहे.त्याच धर्तीवर या कामातुन शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांना सुट देण्याबाबतचे निवेदन बीड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दि.२४ सप्टेंबर २०२० रोजी दिले असल्याची माहिती शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली.

               तसेच याकामी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद बीड चे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संघटनेस दिले असून जवळ जवळ सर्व दिव्यांग कर्मचारी बांधवांना या कामातून वगळण्यात आलेले असून नजरचुकीने कुणाला सर्वेक्षणाचे आदेश आले असतील तर त्यांनी जिल्हा परिषद चे तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करुन रितसर सुट मिळण्याबाबतचा लेखी अर्ज करुन सोबत आँनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडून पोहोच घ्यावी.काही अडचण आल्यास दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष या नात्याने संपर्क करावा.असे राजेंद्र लाड यांनी शेवटी म्हटले आहे.


No comments