Breaking News

आज आष्टीत कोव्हीड हाॕस्पीटलचे उदघाटन

आष्टी :  कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आष्टी शहरात अद्यावत कोव्हीड हाॕस्पीटलची उभारणी करण्यात आलेली असून या हाॕस्पीटलचे उद्घाटन आज शनिवार (दि.17) सकाळी 10 वाजता आ. सुरेश धस, माजी आ. भीमराव धोंडे, माजी आ. साहेबराव दरेकर यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन करण्यात येणार असल्याची माहिती डाॕ. सुदाम जरे व श्याम धस यांनी दिली.

आष्टी शहर तसेच परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी अहमदनगर येथे जावे लागत असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची देखील यामुळे ससेहोलपट होत असल्याचे चिञ होते. याच पार्श्वभूमीवर आष्टी शहरात कोव्हीड हाॕस्पीटलची उभारणी होणे गरजेचे आहे अशी सामान्य नागरिकांची मागणी होती.

त्यामुळे डाॕ.सुदाम जरे यांनी अल्पदरात रुग्णांची सोय व्हावी तसेच त्यांची होणारी ससेहोलपट थांबली पाहिजे या हेतूने शहरातील जोगेश्वरी मंगल कार्यालयाशेजारी ध्रुव कोव्हीड हाॕस्पीटलची उभारणी करण्यात आलेली आहे.या माध्यमातून रुग्णांना अनुभवी डाॕक्टर्सची निगराणी, 8 बेडचा अतिदक्षता विभाग, व्हेंटीलेटरची सुविधा,संपूर्ण बेडसाठी आॕक्सीजन, 24 तास मेडीकल तसेच 24 तास पॕथालाॕजी लॕबची सुविधा या ठिकाणी असल्याची माहिती देखील डाॕ. सुदाम जरे व श्याम धस यांनी यावेळी दिली.


No comments