Breaking News

बीड जिल्हा परिषदेचे उच्च न्यायालय विधी पॅनलवर अँड. हनुमंतराव जाधव यांची नियुक्ती


गौतम बचुटे ।  केज  

बीड जिल्हा परिषदेच्या वतीने विविध खटल्यात उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी केज येथील युसूफ वडगावचे रहीवाशी असलेले अँड हनुमंतराव जाधव यांची बीड जिल्हा परिषदेचे अधिकृत वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

अँड हनुमंतराव जाधव हे केज तालुक्यातील युसुफवडगाव येथील रविवाशी असून ते मागील दहा वर्षां पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खडपीठात काम करीत आहेत. त्यांनी सन २०१८-१९ या वर्षात शंभू महादेव साखर कारखान्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने लढा लढून शेतकऱ्यांना त्यांचे  बिल अदा करण्यास कारखान्याला भाग पाडले आहे. याबाबत अँड. हनुमंतराव  जाधव यांचे शेतकऱ्यांनी  कौतुक केले होते. या सर्व बाबींमुळे अँड हनुमंतराव जाधव यांच्या  अभ्यासपूर्ण कामाची दखल घेऊन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजित कुंभार यांनी सामान्य  प्रशासन विभागाच्या वतीने अँड. हनुमंतराव जाधव यांची बीड जिल्हा परिषदेचे अधिकृत विधिज्ञ म्हणून नियुक्ती केली आहे. यामुळे आता जिल्हा परिषद बीडच्या विरोधात मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, मा. कामगार न्यायालय, औरंगाबाद, मा. औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद न्यायाधिकरण औरंगाबाद (मॅट) येथे दाखल होणाऱ्या प्रकरणामध्ये बीड जिल्हा परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी या आदेशान्वये जिल्हा परिषद, बीडच्या पॅनलवर अँड. हनुमंतराव जाधव यांची अधिकृत विधीज्ञ म्हणून नियुक्तीचे आदेश निर्गमीत केले आहेत. या निवडीबद्दल अँड हनुमंतराव जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


No comments