Breaking News

पोलीस कर्मचारी हनुमंत चादर यांनी एक लाख रुपयाचा बॉण्ड केला परत

गौतम बचुटे । केज 

येथे रस्त्यावर सापडलेला एक लाख रुपये बचतीचा बॉंड केज पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी हनुमंत चादर यांनी परत केला.

 या बाबतची माहिती अशी की केज पोलीस स्टेशन समोर पोलीस कर्मचारी हनुमंत चादर हे केज येथे त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांना पोलीस स्टेशन समोरील मुख्य रस्त्यावर बँक ऑफ महाराष्ट्रा चा एक लाख रुपये किंमतीचा ठेवीचा मुदतीचा बॉंड सापडला. त्यावरील नावावरुन त्यांनी शोध घेतला असता बॉंड विजय हरिभाऊ सोनवणे यांच्या नावाचा होता. त्यानंतर तपास करून विजय सोनवणे यांच्याशी संपर्क साधून त्यांची ओळख पटविली. सदर प्रकरणी विजय सोनवणे यांची ओळख पटवून व खातरजमा करून यांना परत केला. या वेळी पोलिस कर्मचारी हनुमान चादर वाहतूक शाखेचे जिवन करवंदे हे उपस्थित होते. या प्रामाणिकपणा बद्दल पोलीस नाईक हनुमंत जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


No comments