Breaking News

शासकीय हमी भावाने खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं फडणीस यांचे आवाहनबीड  : जिल्हयातील कापूस खरेदी सुरळीत होण्यासाठी जिल्हयातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय हमी भावाने महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ किंवा भारतीय कापूस निगम (सी.सी.आय.) यांचे कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्री करावयाचा आहे. अशा शेतकऱ्यांनी स्वत:चे आधार कार्डची छायांकित प्रत, एक पासपोर्ट आकाराचा एक रंगीत फोटो, राष्ट्रीयकृत, खाजगी बँका किंवा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व अद्ययावत कापूस पेऱ्याची नोंद असलेला सातबारा ची छायांकित प्रत आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याचे सातबारा वर अद्ययावत कापूस पेऱ्याची नोंद नसल्यास गाव कामगार तलाठी यांचे सही शिक्क्यासह अद्ययावत पीक पेरा प्रमाणपत्र या कागदपत्रांसह तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑनलाईन कापसाची नोंद करावी.

शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी त्यांनी केलेल्या नोंदणीच्या प्राधान्यक्रमानुसार केली जाईल. सदर कापसाची नोंद करण्यासाठी जिल्हयातील केवळ कृषी उत्पन्न बाजार समित्यांना लिंक देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना या संदर्भातील आवश्यक त्या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे कापसाच्या ऑनलाईन नोंदी करण्यासाठी संगणक, इंटरनेट सुविधा व कर्मचारी उपलब्धतेसह आवश्यक ती सर्व व्यवस्था करावी. जिल्हयातील प्रत्येक बाजार समितीने आपले कार्यक्षेत्रातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापसाची नोंदणी फक्त बाजार समितीच्या कार्यालयातच केली जाणार असल्यामुळे त्यांनी बाजार समिती शिवाय अन्यत्र कोठेही त्यांच्या कापसाची नोंद करु नये असे आवाहन प्रवीण फडणीस, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांनी केले आहे.
No comments