Breaking News

साळेगावचा आठवडी बाजार आता नियमित भरणार - सरपंच कैलास पाटीलगौतम बचुटे । केज 

आठवडी बाजारा संबंधी मा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या आदेशा नुसार केज तालुक्यातील साळेगाव येथे दर गुरुवारी भरणारा आठवडी बाजार सर्व नियमांचे पालन करून भरणार असल्याची माहिती सरपंच कैलास जाधव यांनी दिली आहे.

साळेगाव ता. केज येथे दर गुरुवारी भरणारा जनावरांचा आठवडी बाजार लॉक डाउन मुळे बंद होता. परंतु आता लॉकडाउन शिथिल होत असल्याने मा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील आठवडी बाजार भरवण्या संदर्भात आदेश काढले आहेत. त्यामुळे येत्या गुरुवार पासून पुन्हा साळेगाव येथील बाजार तळावर पूर्वी प्रमाणेच गाई, म्हशी, बैल व शेळ्यांचा बाजार भरवण्यात येणार आहे. परंतु कोव्हीड-१९ या साथरोगाची सर्वांनी काळजी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी खालील नियमांचे सर्वांनी पालन करण्याचे आव्हाहन सरपंच कैलास जाधव पाटील, उपसरपंच श्रीमंत गित्ते आणि ग्रामसेवक दत्तात्रय गव्हाणे यांनी केले आहे.

बाजारात येणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांनी सर्वांनी मास्क वापरावेत. दोन व्यक्तींमध्ये सहा फूट एवढे सामाजिक व सुरक्षित अंतर पाळावे. सामाजिक अंतराचे पालन न केले गेल्यास संबधीत विक्रेता व ग्राहक यांचे विरूध्द कायदेशिर कारवाई करून दंड आकारण्यात येईल. आठवडी बाजारचे ठिकाणी गुटखा, तंबाखू व पान इ . धुम्रपानास बंदी आहे. प्रत्येक विक्रेत्याने माल विक्री करण्या पूर्वी स्वत: सॅनिटायझरचा वापर करावा.

 हात साबणाने स्वच्छ धुवावे. चेहऱ्याला व डोळ्यांना हात लावणे टाळावे. सर्दी, ताप, खोकला, डोके दुखी, श्वसनाचा त्रास किंवा लक्षणे असणाऱ्यांनी बाजारात येण्याचे टाळावे. मास्क न लावल्यास ग्रामपंचायत ५००/- रु. दंड आकारण्यात येईल. याची सर्वांनी दक्षता घ्यावी. असे नम्र आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच कैलास जाधव यांनी केले आहे.


No comments