Breaking News

जानेगावच्या सरपंच पतीवर प्राणघातक हल्ला !

किरकोळ मारहाणीचे गुन्हे दाखल करून पोलीस हल्लेखोरांना देतायत अभय,  सरपंच पत्नीचा आरोपगौतम बचुटे । केज   

तालुक्यातील जानेगाव येथील सरपंच सौ. आम्रपाली ओव्हाळ यांच्या पतीवर गावातील गावगुंडांनी खुनी चाकू हल्ला करून जिवे करण्याच्या उद्देशाने त्यांना गंभीर दुखापत केली आहे. या प्रकरणी अँट्रोसिटीसह मारहाणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु सरपंच सौ.आम्रपाली ओव्हाळ यांनी पोलीसांनी हल्लेखोरांना अभय देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.

या बाबतची माहिती अशी की, गांधी जयंतीच्या दिवशी जानेगाव ता. केज येथील मागास प्रवर्गातील महिला सरपंच सौ. आम्रपाली ओव्हाळ यांचे पती विलास दशरथ ओव्हाळ हे सायंकाळी ५:०० वा. च्या सुमारास केज कडून जानेगावकडे जात असताना त्यांना महादेव शिंदे याने रस्त्यात अडवून गावातील शाळेकडे घेऊन गेला. त्यानंतर अशोक फुलचंद शिंदे व अशोक उर्फ भैय्या हरिभाऊ शिंदे यांनी विलास यास जातीवाचक शिवीगाळ करून अशोक शिंदे याने त्याच्या जवळील चाकूने विलास ओव्हाळ यांच्या छातीवर दोन ठिकाणी बरगडीत भोकसून वार केले. तसेच यावेळी अशोक उर्फ भैया शिंदे यांनी विलास ओव्हाळ याचे हात दोन्ही हात धरून ठेवले होते. जखमी विलास ओव्हाळवर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी अंबाजोगाई येथे जाऊन जखमी विलास ओव्हाळ यांची भेट घेतली.


या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस स्टेशनला महादेव शिंदे, अशोक फुलचंद शिंदे व अशोक उर्फ भैय्या हरिभाऊ शिंदे सर्व रा जानेगाव ता केज यांच्या विरुद्ध गु.र.नं. ३००/२०२० भा.दं.वि. ३२४, ५०६, ३४ आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा ३(१) (आर) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या  प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस हे पुढील तपास करीत आहेत.पोलीससांची संदिग्ध भूमिका ! 

"माझ्या पतीवर खुनी हल्ला झालेला असताना देखील युसुफवडगाव ठाण्याचे पोलीस अधिकारी यांनी हल्लेखोरांवर अगदी किरकोळ कलमान्वये गुन्हा दाखल करून हल्लेखोरास मदत केली आहे. ही पोलिसांची भूमिका संदिग्ध असून या विषयी मी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे दाद मागणार आहे." असं जानेगावच्या सरपंच सौ. आम्रपाली विलास ओव्हाळ म्हणाल्या. 


Z

No comments