Breaking News

ना. धनंजय मुंडे व अमरसिंह पंडित यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला


पिक विम्यासह शासनाकडूनही जास्तीत जास्त मदत दिली जाईल- ना. धनंजय मुंडेगेवराई :  पालकमंत्री धनंजय मुंडे व माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी चिखल तुडवत बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची त्यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांना दिलासा दिला. संकटकाळात खचू नका, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, पीक विमा नुकसान भरपाईसह शासन मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन ना. धनंजय मुंडे यांनी केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. त्यांनी हिरापूर, इटकूर, मादळमोही, पाडळसिंगी, मिरकाळा, धर्मेवाडी व श्रींगारवाडी येथे दौरा केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी रविवारी (दि. १८) सकाळी गेवराई विधानसभा मतदार संघातील  इटकुर, मादळमोही, पाडळसिंगी, मिरकाळा, धर्मेवाडी व श्रींगारवाडी भागाचा दौरा करून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. त्यांच्या सोबत माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यासह पदाधिकारी  महसूल, कृषी आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ना.धनंजय मुंडे यांनी ईटकुर येथील शेतकऱ्यांच्या परतीच्या पावसाने वाया गेलेल्या सोयाबीन आणि कापुस पिकांची पाहणी करुन त्यांना धिर दिला तसेच मादळमोही, पाळसिंगी, धर्मेवाडी व श्रींगारवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेत आणि बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनीही शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेऊन त्यांना धीर दिला.  सरकार आपले आहे, कांही काळजी करु नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. शासन मिळत जास्तीत जास्त मिळवून देऊ असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना धिर दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जि. प. सभापती बाबुराव जाधव,  जयभवानी कारखान्याचे व्हाईह चेअरमन जगन्नाथ शिंदे, सभापती संग्राम आहेर, जिल्हा बँकेचे संचालक कैलास नलावडे,  कुमारराव ढाकणे, दीपक वारंगे, राजेंद्र वारंगे, बळीराम रसाळ, फुलचंद बोरकर, भाऊसाहेब माखले, बाबुराव काकडे, जयसिंग जाधव, सुभाष मस्के, सुनील पाटील, वैजिनाथ मासाळ, शरद चव्हाण, सुनील तौर, सभापती खुळे, शिवाजी मोरे,
सुभाष मस्के, सुनील पाटील, विकास सानप, संतोष आंधळे, आप्पासाहेब गव्हाणे, जयदीप औटी, दत्ता दाभाडे, अक्षय पवार, सुभाष महाराज नागरे, बाबासाहेब आठवले, झुंबर निकम, शेख सलिम, अनिरुद्ध तौर, सुनील ढेंगळे, भ गवत चौधरी, संतोष चव्हाण, हनुमान मावसकर  यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते


No comments