Breaking News

आ. बाळासाहेब आजबे यांची कोविड सेंटरला भेट


रुग्णांची काळजी घ्या व कोविड सेंटर सुविधा पुरवा आमदार आजबे यांनी दिले निर्देश

आष्टी : कोरोना रुग्णांची डाॅक्टरांनी योग्य ती काळजी घेऊन त्यांना देण्यात येणा-या सुविधेमध्ये कोणतीही कमतरता पडता कामा नये,जर त्यांना व्यवस्थित सुविधा पुरविल्या नाहीत तर जबाबदार कर्मचा-यांची हयगय केली जाणार नसल्याचे आ. बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

               

आष्टी येथील औघोगिक प्रशिक्षण केंद्रांत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांनावर उपचार सुरू असून,या कोविड सेंटर ला आज दि.12 सोमवार रोजी दुपारी दिड वाजता मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.

 

यावेळी आष्टी ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.राहूल टेकाडे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डाॅ. शिवाजी राऊत,काकासाहेब शिंदे, भाऊसाहेब घुले, चिंचाळा उपसरपंच अशोक पोकळे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या समस्या आमदारांनी जाणून घेतल्या तसेच कोविड सेंटरला पिण्याचे पाणी, सांडपाणी याची व्यवस्था पाहुन दररोज रुग्णांसाठी येणा-या जेवणाची विचारपुसही आ.आजबे यांनी केली. तर या रुग्णांना सर्व सुविधा व्यवस्थित पुरविण्यात याव्यात तसेच कर्मचारी व अधिका-यांनी आपल्या कामात हलगर्जी पणा करू नये,जर कोणी कर्तव्यात हलगर्जीपणा केला तर त्यांची गय केली जाणार नसल्याचेही आ.आजबे यांनी सांगितले.

गरज भासल्यास अजून, सेंटर उभारु-आ. आजबे

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. याठिकाणी Jशंभर रुग्णांची क्षमता असून,जर रुग्ण अशेच वाढत राहिले तर अजून सेंटर उभारण्यात येईल यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे आ.बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.No comments