Breaking News

रयत सामाजिक प्रतिष्ठान कडून जागतिक अंधदिन साजराबीड :   शहरातील रयत सामाजिक प्रतिष्ठाणने जोगवा मागून उपजीविका भागविणारे रामेश्वर भोसले या दोन्ही डोळे गमावलेल्या व्यक्तीला जागतिक अंध दिनाचे औचित्य साधून आर्थिक मदत, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. 
रामेश्वर भोसले यांना लहानपणी झालेल्या अपघातामध्ये दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमवावी लागली. शिवाय तेव्हापासून त्यांना डोळ्यांचा मोठा रोग असलेला रेटिना हा रोग जडला. तेव्हापासून ते आपल्या सत्तर वर्षे आयुष्य असलेल्या आईचा व त्यांच्यापेक्षा वयाने पंधरा वर्षांनी मोठ्या असलेल्या पत्नीचा जोगवा मागून सांभाळ करीत आहेत. 

त्यांच्या बाबतची ही माहिती रयत सामाजिक प्रतिष्ठाणच्या सचिव श्रीमती रोहिणी गणेश माने यांच्या कानी आली. म्हणून त्यांनी 15 ऑक्टोबर रोजी जागतिक अंधदिनाचे औचित्य साधून रामेश्वर भोसले यांना आर्थिक मदत, प्रतिष्ठाणचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. यावेळी रोहिणी माने यांच्यासह गणेश माने, ॲड. दीपक रोटे, ॲड. गीता करमाळकर, डॉ. आनंद कुमार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, सारिका काळे, जिजाबाई साळवे, माया तिरुमले, विकास धोत्रे, सोनू जाधव, दत्तात्रय कारंडे, मुन्नाभाई पेंटर, पत्रकार एस.एम.युसूफ आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सत्कारमूर्ती रामेश्वर भोसले यांनी भारावून म्हटले की, रयत सामाजिक प्रतिष्ठाणच्या सचिव रोहिणी माने, यांनी अंधदिनानिमित्त नोंद घेत समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते केलेल्या माझ्या या सन्मानाबद्दल मी आभार व्यक्त करतो. No comments