Breaking News

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास थांबवा

 राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची तहसीलदार यांच्याकडे मागणी

शिरूर कासार : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना असंख्य प्रश्नांचा सामना करावा लागतोय. परीक्षा पध्दतीतील त्रुटींचा ऑनलाईन परीक्षेत सुधारणा करून विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास थांबवावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे आहे, की ऑनलाईन परीक्षेत नियोजन शून्यता, मॅक टेस्टचा अभाव, कुशल मनुष्यबळाचा अभाव, हेल्पलाईन केंद्राची अकार्यक्षमता, प्रशासकीय दिरंगाई, विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा वेळ निघून गेला तरीही लॉगइन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय काही ठिकाणी अर्धे प्रश्न दिसत होते तर अर्ध्या प्रश्नांचे फक्त पर्याय दिसत होते. असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत असून या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी विद्यापीठ सक्षम आहे असं वाटत नसल्याचं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने निवेदनात नमूद केलं आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्यांना होत असलेला मानसिक त्रास थांबवा अन्यथा ह्या समस्या अशाच राहिल्या तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यापीठा समोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रणव मंगरूळकर, विशाल केदार, सिद्धार्थ उघडे, जयदत्त केदार, अमोल बाबरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी दिला आहे. No comments