Breaking News

कोरेडेवाडीच्या माजी सरपंचाच्या पतीस मारहाणगौतम बचुटे । केज  

तालुक्यातील कोरेडेवाडीच्या माजी सरपंचाच्या पतीस तिघांनी अडवून मारहाण केली आहे.

कोरेवाडी ता. केज येथील माजी सरपंच सौ. झेलनबाई कोरडे यांचे पती भागवत नाना कोरडे वय ५५ वर्षे हे १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:०० वा. विडा ते कोरडेवाडी रोडने कोरडवाडी येथे मोटारसायकलने जात असताना गोवर्धन कोरडे, गोवर्धन नाना कोरडे आणि उत्तम भिकु कोरडे हे पण त्यांच्या मोटार सायकलने जात होते. तेव्हा त्या तिघांनी भागवत कोरडे यांना जुन्या भांडणाची कुरापत काढुन शिवीगाळ केली.

 तसेच चापटाने व लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवाजी गोवर्धन कोरडे याने उचलुन आपटले. यात भागवत कोरडे यांच्या डाव्या हात्याचे बोट मुरगळले आहे. तसेच तुला जिवे मारून टाकन्याची धमकी दिली. या प्रकरणी गोवर्धन कोरडे, गोवर्धन नाना कोरडे आणि उत्तम भिकु कोरडे यांच्या विरुद्ध अदखलपात्र स्वरूपाचा गु.र.नं. ७७९/२०२० भा.दं.वि. ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण मुंडे हे पुढील तपास करीत आहेत.No comments