Breaking News

ओंकार धसचा भव्य नागरी सत्कार

Z

गौतम बचुटे । केज राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत केज तालुक्यतील सांगवी (सारणी) येथील ओंकार धस याने मिळविलेल्या यशाबद्दल गावकऱ्यांनी त्याचा नागरी सत्कार केला.

सारणी सांगवी येथील ओंकार रमेश धस या विद्यार्थ्याने राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षेत ७२० गुणांपैकी ६०८ गुण प्राप्त केले आहेत  या बद्दल त्याचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार, नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुमंतजी धस, भाजपा नेते व रोहयो तालुका अध्यक्ष दत्ता धस, जेष्ठ नेते वसंत केदार, एम.डी. घुले सर, काशिनाथ केंदार, मनसे तालुका अध्यक्ष कल्याण केदार, सरपंच प्रल्हाद गायकवाड, ग्रा.पं. सदस्य शरद केदार, चंद्रभान धस, वसंत धस, महादेव केदार, वसंत आतकरे, नवनाथ धस, बालासाहेब बिक्कड, केशव बिक्कड, विजय बिक्कड, राहुल वायकर, प्रशांत कळेकर, भगवान चाळक, मच्छीद्र भाऊ धस, हनूमंत केदार, अनंत धस, अप्पासाहेब धस, रामचंद्र धस तसेच सांगवी येथील सर्व मित्रपरीवार जेष्ठ नागरीक व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते . सुत्रसंचलन कल्याण केदार यांनी तर आभार सचिन धस सर यांनी व्यक्त केले.


No comments