Breaking News

केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विषयक ऐतिहासिक विधेयक कायद्याचे अंमलबजावणी करावी


आष्टीत भाजपनेते भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन 

के. के. निकाळजे । आष्टी 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कृषी विषयक ऐतिहासिक विधेयक मंजूर करुन शेतक-यांच्या जीवनातील अमुलाग्र बदल घडवणारे क्रांतीकारक पाऊल उचलले आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्रसरकारच्या कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती आदेश दिले आहेत. यामुळे शेतकरी वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान होणार आहे.केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विषयक ऐतिहासिक विधेयक कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्यात यावी अशी प्रमुख मागणी आष्टी तालुक्यातील भाजप विविध सेल,आघाडीचे पदाधिकारी यांनी माजी आ.भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करीत आष्टीच्या नायब तहसिलदार शारदा दळवी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.

यावेळी बबनआण्णा झांबरे, ॲड.साहेबराव म्हस्के, ॲड.हनुमंत थोरवे, अजयदादा धोंडे, संतोषभैय्या चव्हाण, शेख मैनौद्दीन, विठ्ठल लांडगे, माजी सभापती बापुराव गर्जे, छगन तरटे, सतीषमामा झगडे, रघुनाथ शिंदे, बाबु कदम, अज्जुभाई शेख, तात्यासाहेब कदम, बबन औटे, संभाजी जगताप, आण्णा लांबडे, सदाशिव दिंडे, दादा जगताप, विष्णू निंबाळकर, संजय नालकोल ,लक्ष्मण उकले, नानाभाऊ वाडेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ॲड. साहेबराव म्हस्के,माजी आ.भीमराव धोंडे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी राज्यातील आघाडी सरकारविरुध्द घोषणा देण्यात आल्या तर मोदी साहेब आगे बढो ,पंकजाताई आगे बढो,,भीमराव धोंडे आगे बढो  हम तुम्हारे साथ है. ठाकरे सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.


No comments