Breaking News

उत्तर प्रदेशच्या निंदनिय घटनेचा स्वाभिमानी संघटनेने केला निषेध


कासम शेख । कडा
उत्तर प्रदेश हा बलात्कार प्रदेश झाला असून अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मागास प्रवर्गातील महिला व मुलींवर तिथे मोठ्या संख्येने अन्याय अत्त्याचार वाढले आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वतः जातीयवादी व सनातनी मनुवादी विचारांचे पुरस्कर्ते असल्याने उत्तर प्रदेशामध्ये यांच्या कडून अन्याय अत्त्याचाराना रोखले जात नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वत्र हाहाकार माजला आहे. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.असे स्वाभिमानी सघंटनेकडून आष्टी तहसिल तसेच उपविभागिय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदना मार्फत मागणी केले आहे.
       
   उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील एका छोट्या गावात कु. मनीषा वाल्मिकी या अनुसूचित जातीच्या १९ वर्षीय मुलीवर सवर्ण ठाकूर व ब्राह्मण समाजातील चार नराधमांनी दि. १४ सप्टेंबर २०२० रोजी अमानुष सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर प्रचंड मारहाण करून तिच्या कमरेचा मनका तोडला, तिने तक्रार करु नये म्हणून तिची जीभ छाटली. 

         गंभीर जखमी अवस्थेतील या तरुणीला हाथरसच्या साधारण रुग्णालयात भरती करुन सामान्य वार्डात ठेवण्यात आले पण तिची वैद्यकीय तपासणी २२ सप्टेंबर पर्यंत करण्यात आली नाही. पोलीस आणि डॉक्टरच्या मिलीभगतमुळे बलात्कार झाला नसल्याचा खोटा अहवाल देण्यात आला आहे. हे निंदनीय असून न्यायाचा गळा घोटणाऱ्या या कृत्याचा आम्ही जाहिर निषेध करीत आहोत.असे देखील म्हटले आहे.तसेच
मनीषाची प्रकृती जास्त बिघडल्यानंतर दिल्लीला सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. तिथे देखील योग्य उपचार करण्यात आले नाहित, यामुळे तिचा २९ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. तिचे प्रेत नातेवाईकांना न देता उत्तर प्रदेश मधील हाथरस पोलिसांनी रात्रीच्या अडीच वाजता गुपचूप पेट्रोल टाकून मनिषाचे प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा तीचा प्रयत्न करण्यात आला. 
        शासन, प्रशासन, पोलीस आणि जातीयवादी लोकांनी मनिषावर जाणीवपूर्वक हा सामुहिक अन्याय केला असून या सर्वांवर गुन्हे दाखल होऊन अनुसूचित जाती जमाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी.  मृत्यू आधी तेथील पोलिसांना दिलेल्या जबानीत मनिषाने सर्व काही सविस्तर कथन केले असले तरीही त्या प्रमाणे गुन्हा दाखल न करता पोलिसांनी अत्त्याचार करणाऱ्या जातीयवादी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अभय देण्याचे काम केले आहे. या प्रकरणी सविस्तर उच्चस्तरीय चौकशी करून जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवून सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी देखील दिलेल्या निवेदना मार्फत मागणी करण्यात आली आहे.

           दरम्यानच्या काळात उत्तर प्रदेशात आणखी कांही अन्याय अत्त्याचारांच्या घटना घडल्या आहेत,व घडत आहे. हथरस नंतर बलरामपुर, बुलंदशहर, भदोही इत्यादी भागातही जातीयवादी भावनेतून बलात्कार व गंभीर अन्याय अत्त्याचार प्रकरणे घडत आहे व घडली आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रशासनावरील पकड ढीली झाली असेल किंवा ते स्वतः अश्या कृत्याना प्रोत्साहन देत असतील असे देखील म्हटले आहे. यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे. सन्माननीय राष्ट्रपती यांनी हस्तक्षेप करून उत्तर प्रदेश सरकार तात्काळ बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, नसता देशभर असंतोष पसरलेल अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने देखील लोकशाही मार्गाने आंदोलने करण्यात येतील, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आष्टी तालुका अध्यक्ष किरण आखाडे यांनी दिले आहे. No comments