Breaking News

शहराच्या मुख्य रस्त्यावर एस टी महामंडळाची बस फसली!सहा वर्षांपासून पुलाचे काम रखडले, नागरिकात संताप!

शिरूर कासार : शहरातील सिद्धेश्वर चौक ते कोळवाडी चौक या मुख्य रस्त्यावर काल रात्री एसटी महामंडळाची मालवाहतूक बस फसल्याने रस्त्यावर बराच काळ ट्रॅफिक जाम होती त्यामुळे अनेक वाहनधारकांची तारांबळ उडाली.

 मंगळवारी (दि.२९) रात्री औरंगाबाद विभागाची मालवाहू बस भर पावसाळ्यात झालेल्या पाण्याच्या डोहात  नुकतीच  माती टाकल्याने बस पूर्णपणे जाग्यावरच  फसल्याने अखेर जेसीबीच्या साह्याने बराच काळानंतर काढण्यात यश आले दरम्यान काळात मात्र येणाऱ्या जाणाऱ्यांच्या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला तर अनेक नागरिकांनी या रस्त्याचे काम होऊन जवळपास सहा वर्ष झाले असले तरीही अद्याप पर्यंत तेथे पूल बांधण्यात आलेला नाही अशी शोकांतिका व्यक्त करत गुत्तेदार व प्रशासनाला  दुषणे दिली. या ठिकाणी अनेक दुचाकीधारक घसरले आहेत त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा मोठा ओघ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे त्यामुळे बांधकाम विभाग व नागरपंचयातनी लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय थांबवून रखडलेल्या पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.


No comments