Breaking News

परळीतील त्या 9 रेशन दुकानांचे लायसन्स रद्दपरळी : लॉक डाउनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य माणसापुढे स्वतःच्या व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा होता. अनेक सामाजिक संस्था,   गरजवंत नागरिकांना अन्न व गृह उपयोगी मूलभूत वस्तू वाटप करत असताना  काही स्वस्त धान्य दुकानदार  शासनाकडून आलेल्या धान्याचा अपहार करुन गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवत होते. चढ्या भावाने मालाची  विक्री करून आर्थिक लूट करत होते. एकंदरीत हा सर्व प्रकार म्हणजे "मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा" प्रकार सुरू होता. परळी शहर व तालुक्यात रेशनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू होता. गोरगरिबांसाठी आलेले धान्य वाटप न करता  धान्याचा अपहार केल्याप्रकरणी परळी शहरातील नऊ रेशन दुकानांचे परवाने रद्द केल्याने एकच खळबळ उडाली आहे.


    अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५९ हजारांच्या खाली आहे़ त्यांना शासनाकडून पिवळे रेशनकार्ड दिले जाते. आणि त्याद्वारे गहू २ रुपये प्रतिकिलो, तांदूळ ३ रुपये प्रतिकिलो दिला जातो.  अनेक कुटुंबांतील काही व्यक्तींची नावे रेशनकार्डमध्ये आहेत. आधारकार्ड रेशन दुकानदाराला दिलेली आहेत तरी ही  त्यांना रेशनधान्य दुकानात धान्य देण्यास नाकारले जात होते. तर अनेकांना  आधारकार्ड नाही म्हणून माल दिला जात नव्हता, तोच शिल्लक माल चौपट किमतीने इतर ग्राहकांना विकला जात होता. या सर्व प्रकाराबाबत परळी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील मस्के यांनी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कडे तक्रार केली होती. 

 रुटनॉमिनी च्या नावाखाली या रेशन दुकानदारांन कडून हजारो क्विंटल धान्याचा अपहार केला जात होता. हे प्रकरण 2018 पासून सुरू होते. या प्रकरणी अनेक  नागरिकांनी तक्रारी करूनही ही या दुकानदारांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.  अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या परळी शहरातील 9  भ्रष्ट रेशन दुकानदारावर कारवाई करण्यास भाग पाडले. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील प्रशासन तसेच पुरवठा विभागाकडून माहिती  मागवली आणि तात्काळ या सर्व दुकानदारा विरुद्ध कारवाई केल्याने परळीसह जिल्ह्यातील भ्रष्टाचार करणाऱ्या रेशन दुकानदारांन मध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे परळी शहरात अजूनही राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांकडे रेशन दुकानदारांचे लायसन आहे. अशा कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना मोफत राशन तर दिलेच नाही परंतु त्यांना मिळणारे इतर धान्यही दिले जात नाही. आणि हे सर्व धान्य काळ्याबाजारात विक्री करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. अखेर त्या भ्रष्टाचाराला वाचा फुटली आणि अधिकाऱ्यांनी अशा भ्रष्ट रेशन दुकानदार विरुद्ध कारवाई केल्याने परळी आणि परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अजूनही अनेक बहुतांशी रेशन दुकानदार सामान्य नागरिकांना तुमचे धान्य आलेच नाही, तुमची ऑनलाइन लिंक झालीच नाही ,अशी कारणे सांगून धान्य वाटप केले जात नाही. अशा ही दुकानदारांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच ही लायसन्स रद्द केली पाहिजेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

या 9 रेशन दुकानाचे परवाने रद्द

 शहरातील बरकत नगर भागात असलेले माजी नगराध्यक्ष जाबेरखा पठाण यांचे रेशन दुकान, अविनाश अदोडे भिमनगर ,नाथराव मुंडे सोमेश्वर नगर, संग्राम गीते चांदापूर, कमलेश जगतकर पंचशील नगर, हर्षद अदोडे भिम नगर, राजन वाघमारे इंद्रानगर, मधुकर जायभाये हलगे गल्ली, आणि उद्धव मुंडे गुरुकृपा नगर

नियमांची पायमल्ली

 रेशन दुकानाचा बोर्ड दर्शनी भागात लावणे, दुकानाची वेळ, वजनकाट्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवणे, स्टॉक पुस्तक , रेशनधान्य मालाचा भावफलक दर्शनी जागेत लावणे अशा नियमांची पायमल्ली दुकानदारांकडून सर्रासपणे होत आहे. 

एक देश,एक रेशन कार्ड’ योजना लागू करावी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित-गरीब घटकाला सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ मिळावा म्हणून केंद्र सरकार ने ‘एक देश,एक रेशन कार्ड’ योजना कांही राज्यात सुरु केली आहे. या योजनेमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या कोणाही गरीबाला त्याची हक्काची सरकारी मदत, सवलतींचा लाभ मिळू शकणार आहे,  ही योजना रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या मजूर, कष्टकऱ्यांना डोळ्यापुढे ठेवून आखण्यात आली असून त्याने भ्रष्टाचारालाही आळा बसेल. या योजनेमुळे देशात कोणत्याही ठिकाणी कोणत्याही लाभार्थ्याला धान्य घेणे शक्य होणार आहे. 


No comments