Breaking News

राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या हलगर्जीपणाच्या धोरणाविरुद्ध 7 नोव्हेंबरला मशाल मार्च


मातोश्रीवर धडकणार मशाल मार्च शिवसंग्रामचा पाठींबा 

आमदार विनायक मेटे यांची पत्रपरिषदेत माहिती


स्वतः आ. मेटे यांच्यासह शिवसंग्रामचे पदाधिकारी- कार्यकर्ते लोकप्रतिनिधी होणार सहभागी

बीड : महाविकास आघाडीचं सरकार मराठा आरक्षणाबाबत हलगर्जीपणाचं धोरण अवलंबित आहे. या विरुद्ध बांद्रा येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर समाजच्या वतीने दि. ७ नोव्हेंबरला मशाल मार्च काढण्यात येणार आहे. मशाल मार्चला शिवसंग्रामचा जाहीर पाठींबा शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी दिलाय. तसेच या मार्चमध्ये ते स्वतः सहभागी होणार असून शिवसंग्रामचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती आमदार मेटे यांनी दिली. बीड येथील शिवसंग्राम भवनमध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मराठा आरक्षण युवा - विद्यार्थी परिषदेचे अशोक सुखवसे, ऍड शशिकांत सावंत, ऍड शेळके,  बबनराव शिंदे, ऍड दोडके, मुकुंद गोरे, गणेश मस्के उपस्थित होते.     आमदार मेटे म्हणाले की, मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारच्या उदासीन धोरणा मुळे महाराष्ट्र बचबच माजली आहे. नोकर भरती, मेघा भरती रखडली आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या हलगर्जीपणाच्या धोरणाविरुद्ध 7 नोव्हेंबरला  मशाल मार्च काढण्यात येणार आहे. तो बांद्रा येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' पर्यंत हा मशाल मार्च काढण्यात येणार आहे, असं मेटे यांनी सांगितले.


मंत्रिमंडळातील सदस्य बेजबाबदारपणे बोलत आहेत, मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हलगर्जीपणाने वागत आहेत. त्यामुळे चव्हाणांना पदावरून हटवून योग्य व्यक्तीची निवड या पदावर करण्यात यावी, समाजाला न्याय देण्यासाठी योग्य धोरण आखावे यासाठी हा मशाल मार्च निघणार असल्याचं आमदार मेटे म्हणाले.  


 

५ नोव्हेंबर रोजी मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषदेचे आयोजन बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील अभ्यासू युवकांनी केले आहे. या माध्यमातून आम्ही सर्व युवक - विद्यार्थ्यांना आरक्षणसंबंधी मार्गर्दर्शन, योग्य कायदेशीर माहिती मिळावी, यासाठी आरक्षण लढ्यासाठी आवश्यक माहिती या परिषदेतून दिली जाणार असल्याचं आ. विनायक मेटे यांनी सांगितले.


No comments