तब्बल 7 महिन्यांनंतर परळीच्या रेल्वे स्थानकावर नांदेड- पनवेल एक्सप्रेसचं दर्शन
परळी : जवळपास सात महिन्याच्या लॉकडाउन नंतर एक एक नागरी सुविधा अनलॉक होत आहेत. बंद च्या मोठ्या कालखंडानंतर आज प्रथमच धावणारी नांदेड- पनवेल एक्सप्रेसचे परळी स्थानकावर आगमनझालें.
संपूर्ण आरक्षण असणारी गाडी व पनवेलकडे असणारा हा पहिला प्रवास. कोरोना विषाणू संसर्गाची काळजी म्हणून परळी पासून चढणाऱ्या प्रवाशांची रेल्वे नर्सिंग स्टाफ यांच्या द्वारे टेम्प्रेचर तपासणी करून फ्लॅट फार्म वर सोडण्यात आले. उतरणारे, आणि गाडीत चढणारे यांची नोंद घेण्यात आली
सात महिन्याच्या लॉकडाउन नंतर अनलॉक झालेली रेल्वे व्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे. परळी-लातूर-उस्मानाबाद, बार्शी-कुर्डुवाडी-दौड- पुणे मार्गे धावणारी पुणे ,मुंबई कडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्वाची सुविधा आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दोन रेल्वे पोलीस आणि दोन आरपीएफ चे असे एकूण चार कर्मचारी या गाडीत गस्तीवर होते. लोकोपायलट एम. एस. मीना, असिस्टंट पायलट आर. मीना, गाडीचे गार्ड शक्तिवाण कांबळे, स्टेशन सुप्रीडेंट जे. के. मीना, चिफलोको इंस्पेक्टर आर.डी. कांबळे,शिवकांत मळभागे (मेकॅनिकल इंजिनियर), जिआरपी चे बाळासाहेब फड आदींच्या पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
प्रथमच धावणाऱ्या गाडीत प्रवाशी संख्या अल्प होती.फलाटावर सुरक्षा बंदोबस्त मोठा होता. आरपीएफ चे सी.पी.आय. एस. आर. मीना, आणि त्यांचे महिला आणि पुरुष दहा पोलीस कर्मचारी बंदोबस्तात होते.
पनवेल एक्सप्रेस रवाना होते वेळी जेष्ट पत्रकार जि. एस. सौन्दळे, संपादक सतीश बियाणी, आत्मलिंग शेटे, दत्तात्रय काळे, पत्रकार महादेव शिंदे,धनंजय आरबूने,दत्तात्रय लहाने,व्यापारी विष्णुदास बंग, प्रा. महादेव कडगे,संदीप तीळकरी आदी उपस्थित होते.
No comments