Breaking News

ऊसतोड मजुरी दरात किमान 70 टक्के दरवाढ द्यावी - माजी आ. केशवराव आंधळे

लवाद प्रमुख पंकजाताई मुंडे आणि साखर संघ दोन दिवसात तोडगा काढणार


जगदीश गोरे । 
वडवणी

ऊसतोडणी कामगारांच्या संपाबाबद साखरसंघ  व ऊसतोडणी मजूर संघटनेचे प्रतिनिधी, यांच्या मध्ये पुणे येथील साखर संकुल येथे बैठक आज दिनांक 19 ऑक्टोबर सोमवार रोजी चौथी बैठक संपन्न झाली. साखर संघाच्या वतीने, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व साखर संघाचे उपाध्यक्ष व संचालक उपस्थित होते,व ऊसतोड मजूर संघटनेच्यावतीने माजी आमदार केशवराव आंधळे, श्रीमंत जायभाये, दत्तात्रेय भांगे ,ए डी कराड, जिवण राठोड, सुशिलाताई मोराळे, गहिनीनाथ थोरे, प्रदीप भांगे, कृष्णा तिडके, अशोक मुंडे, खेडकर, जीवन राठोड, जाधव व चौगुले हे उपस्थित होते. यावेळी ऊसतोड मजूर कामगारांच्या संदर्भात अनेक प्रश्‍न मांडल्यानंतर साखर संघाच्या वतीने सकारात्मक विचार केला असून दोन दिवसात लवादाच्या प्रमुख पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तोडगा काढणार आसुन ऊसतोड मजुरी दरात किमान 70%  दरवाढ द्यावी अशी मागणी माजी आमदार केशवराव आंधळे यांनी व्यक्त केले आहे.

                 

ऊसतोडणी कामगारांच्या संपाबाबद साखरसंघ  व ऊसतोडणी मजूर संघटनेचे प्रतिनिधी, यांच्या मध्ये पुणे येथील साखर संकुल येथे बैठक आज पार पडली या बैठकीत माजी आमदार केशवराव आंधळे यांनी ऊसतोडणी दर प्रती टन मागे किमान 70% वाढ देण्यात यावी, तसेच माजी पंकजाताई मुंडे यांचा लवाद यापुढे ही कायम राहील. वाहतुकीमध्ये भरघोस वाढ करण्यात यावी. मुकादमाच्या कमीशन मध्ये भरीव वाढ करावी, ऊसतोड मजुरांना विम्याचे संरक्षण द्यावे. त्याचे प्रिमीयम संपूर्ण कारखान्याने भरावे, व ऊसतोड मजूरांना व जनावरांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात यावी, कोरोना मुक्ती साठी कोरोना सेंटर उभारण्यात यावे. ऊसतोडणी मजूरांच्या  कराराची मुदत तीन वर्ष करण्यात यावी. 

ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी निवासी शाळेची सोय करण्यात यावी, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित करण्यात यावे,व ऊसतोड मजुरांन साठी कल्याणकारी योजना राबविण्यात यावी. ऊसतोड मजुरी दरात किमान 70%  दरवाढ द्यावी अशा अनेक मागण्या माजी आमदार केशवराव आंधळे यांनी पुणे येथील साखर संकुल येथील बैठकीत व्यक्त केल्या आहेत या मागण्यांसंदर्भात यावर साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर  यांनी साखर संघाच्या वतीने मागण्यांसाठी  सकारात्मक भूमिका मांडली. त्यामुळे भाजप राष्ट्रीय सचिव लवादाच्या प्रमुख पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड कामगार मजुरांचा प्रश्न दोन दिवसात तोडगा काढून मार्गी लागणार असल्याचे मत माजी आमदार केशवराव आंधळे यांनी व्यक्त केले आहे. लवकरच संपाच्या बाबतीत तोडगा काढून दर वाढ करावी व उसतोड कामगारांना न्याय द्यावा. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ऊसतोड मजुरांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संप चालूच राहील ऊसतोड कामगारांच्या हितासाठी पंकजाताई मुंडे यांचा लवाद  यापुढेही कायम ठेवण्यात यावा अशा प्रकारचीं भुमिका पुणे येथे बैठकीत उपस्थित संघटनेच्या वतीने माजी आमदार केशवराव आंधळे यांनी मांडली आहे.


No comments