Breaking News

संभाजीनगर पोलिसांनी 60 हजाराच्या अवैध दारूसह केला दिड लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त


परळी :  संभाजीनगर पोलिसांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उडानपुला नजीक एका ऑटो मध्ये बाराशे लिटर दारू वाहतूक करत असताना पकडली आहे. सदरील ऑटो चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ६० हजार रुपयांची दारुसह ऑटो असा एकूण दिड लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी सकाळी ११ वाजता संभाजी नगर पोलिसांनी केली.

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाच्या नजीक मोंढा भागात  ऑटो क्रमांक (एमएच २२ - एच २३१९) याची तपासणी केली असता त्यामध्ये बाराशे लिटर दारू आढळून आली. सदरील दारूही 60 हजाराची असून ऑटोसह दीड लाखाचा मुद्देमाल संभाजीनगर पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉभताने, पोना दत्ता गीते, अर्जुन राठोड, पोहेकॉ मोहन दुर्गे यांनी केली. याप्रकरणी आरोपी सह ऑटो ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास संभाजीनगर पोलिस करीत आहेत.No comments