Breaking News

आ.रोहित पवार व युवा नेते अशोक पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त 523 पिठाच्या गिरणीचे आ. आजबे यांच्या हस्ते वाटपके. के. निकाळजे । आष्टी

जामखेड कर्जत मतदारसंघाचे लोकप्रिय आ.रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे कट्टर समर्थक युवानेते अशोक अण्णा पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त आ. बाळासाहेब आजबे मित्र मंडळ व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आष्टी पाटोदा शिरूर यांच्या प्रयत्नाने लोकप्रिय आ. बाळासाहेब आजबे काका यांच्या मार्गदर्शनाखाली  523 गिरणी सवलतीच्या दरामध्ये वाटप करण्यात आले असून सोमवारी  (दि.26)  रोजी आष्टी येथे आ. बाळासाहेब आजबे काका यांच्या हस्ते प्रत्यक्षात गिरणीचे वाटप करण्यात आले.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष डॉ शिवाजी राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी ,किशोर नाना हंबर्डे ,ज्येष्ठ नेते जगन्नाथ ढोबळे ,बाळासाहेब महाडिक, काकासाहेब शिंदे ,शिवाजी नाकाडे ,युवा नेते महेश आजबे ,संग्राम आजबे , डॉ.जालिंदर वांढरे,  राम खाडे ,दादा गव्हाणे ,पससदस्य संदीप अस्वर ,अर्जुन काकडे ,म्हातारदेव गरजे, संजय गुंड, बाळासाहेब झांजे,आजिनाथ गळगटे,नवनाथ आंधळे, सतीश सोले, भाऊसाहेब घुले ,केशव आजबे ,ताराचंद कानडे समीर जाठोत  ,राजू जाधव,तात्या जेवे ,रामदास उद्मले,दिपक पानसांडे डॉक्टर सुनील पारखे ,श्रीमंत आजबे राम सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती .

          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जामखेड कर्जत चे लोकप्रिय आ. रोहित दादा पवार  व युवा नेते अशोक पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील गरजवंतांना 50% सवलतीमध्ये पिठाच्या गिरणी चे वाटप करण्यात आले. या गिरणीसाठी 11000 ,9000 ,8000 अशी सवलत रक्कम असून हीच  पिठाची गिरणी बाहेर मार्केटमध्ये एकवीस हजार ,अठरा हजार व सोळा हजार अशा किमतीत मिळत आहे. परंतु आमदार बाळासाहेब आजबे काका मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आष्टी पाटोदा शिरूर यांच्या पुढाकाराने व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनामुळे या मतदारसंघातील गरजवंतांना फक्त 50%  मध्येच वारंटी गॅरंटी सह गिरणीचे वाटप करण्यात येत आहे .आतापर्यंत पाचशे तेवीस गिरणीची ऍडव्हान्स बुकींग करण्यात आली होती. आज आष्टी येथील आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या कार्यालय समोर जवळपास 100 पेक्षा अधिक गिरणीचे प्रत्यक्षात वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा नेते अशोक अण्णा पोकळे ,रोहित निंबाळकर ,गणेश वाघमारे, नाजीम शेख ,पंडित पोकळे ,बाळू पोकळे, संतोष खंडागळे,सतीश नरोडे ,बंडू काळे ,किरण खवळे,भरत भोगाडे ,विठ्ठल शिंदे ,गणेश भवर ,योगेश भगत, दिलीप आबा जगताप, दादा बन,शरद पोकळे,सचिन भोसले ,बंडू पानतावणे यांनी परिश्रम घेतले.


No comments