Breaking News

शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये व उसाला एकरी एक लाख रुपये मदत द्या - किसकींदा पांचाळबीड : परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून घरांची पडझड झाली आहे. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तर ऊसाला एकरी १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थांपक अधक्षा तथा शिवस्वराज्य युवा महाराष्ट्र महिला आघाडीच्या मराठवाडा अध्यक्षा किसकींदा पांचाळ यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. 

खासदार छत्रपती संभाजीराजे  बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता या वेळी विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थांपक अधक्षा तथा शिवस्वराज्य युवा महाराष्ट्र महिला आघाडीच्या मराठवाडा अध्यक्षा किसकींदा पांचाळ यांनी त्यांची भेट घेतली.  परतीच्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्र शेत पिकांची आणि कितीतरी घरांची पडझड होऊन प्रचंड नुकसान झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतमजुरांना तातडीने दिलासा द्यावा महाराष्ट्रातील झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे तरी  शेतकऱ्यांचे तयार झालेले पीक परतीच्या पावसामुळे संपूर्णपणे नष्ट झाले आहेत तरी आधीच covid-19 मुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी या सोबतच असंघटित शेतमजूर कामगारांची आर्थिक बाबतीतही दैनंदिन अवस्था झालेली आहे.शेतमजूर हा वर्ग मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवणारा वर्ग आहे आपलाप्रपंच मोलमजुरी करून भागवत आहे.C0vid-19 महामारीमुळे लाॅकडाऊन  मध्ये झालेल्या व्यवसाय मजुरी बंद होती आणि या झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील लागणारी कामे पूर्णपणे नाहीसे झाले आहेत अशा परिस्थितीत आपली उपजीविका कशी भागवावी अशावेळी त्यांना आपल्या शासनाच्या मदतीची गरज आहे. 
 
म्हणून पंचनामे करून सरसगट शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये व उसाला हेक्‍टरी एक लाख रुपये आर्थिक मदत लवकरात लवकर द्यावी यासह पावसामुळे घरांची पडझड झालेल्या बांधवांना मदत द्यावी. तसेच शेतमजूर कामगारांना, आपल्या शासनाकडून आर्थिक भरीव मदत द्यावी शेतकरी व शेतमजूरांना कामगारांना आपल्या शासनाकडून आर्थिक भरीव मदत द्यावी शेतकरी व शेतमजुरांना मदतीची अत्यंत गरज आहे. अशी मागणी विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्थापक अध्यक्ष  तथा शिवस्वराज्य महिला आघाडीच्या मराठवाडा अध्यक्षा किसकींदा ताई पांचाळ यांच्या खासदार संभाजी राजे यांच्या कडे निवेदना द्वारे करण्यात आली. यावेळी  शिवस्वराज युवा  महिला आघाडीच्या शहर अधक्षा मनिषा जाधव, उपशहर अध्यक्षा दुर्गा गायकवाड, मीनाक्षीताई कचरे, साप्ताहिक पोलखोल नितेश उपाध्य  संजय कुलकर्णी,भागवत वैद्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments