Breaking News

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्या - आप्पासाहेब येवलेशिरूर कासार 


भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती हा कणा मानला जातो.शेतकरी कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे भरडला जात आहे.खते, बी-बियाणे या साठी लाखो रुपये खर्चूनही उत्पादन चांगले आले असताना शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.

 

शेतकऱ्याच्या कापसाला व उसाला यंदा चांगले उत्पन्न होईल अशी आशा असताना अचानक निसर्गाने घात केला अतिवृष्टी व वारे यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभे असणारे ऊस, कापूस या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. ऊस भुईसपाट झाला आहे व कापूसाचे बोंड काळे पडून सडायला सुरवात झाली आहे. राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे किमान शेतकऱ्यांना आधारभूत दिलास मिळेल.

कोरोनामुळे शेतकऱ्यांचा उभा भाजीपाला सडून गेला आता कापूस सडण्याच्या मार्गावर आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण कापूस पूर्णपणे खराब झालेला आहे.शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास अतिवृष्टीमुळे गेलेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून तात्काळ 50 हजार रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी आ.सुरेश धस साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे स्वीय सहाय्यक आप्पासाहेब येवले यांनी केली आहे.


No comments