Breaking News

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्या - गोकुळ सानप

बीड :  भारतीय अर्थव्यवस्थेचा‌ शेती हा कणा मानला जातो भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे भरडला जात आहे. खते, बी-बियाणे या साठी लाखो रुपये खर्चूनही उत्पादन चांगले आले असताना शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. 

शेतकऱ्याच्या कापसाला व उसाला यंदा चांगले उत्पन्न होईल अशी आशा असताना अचानक निसर्गाने घात केला अतिवृष्टी व वारे यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभे असणारे ऊस, कापूस या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. ऊस भुईसपाट झाला आहे व कापूसाचे बोंड काळे पडून सडायला सुरवात झाली आहे.राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे किमान शेतकऱ्यांना आधारभूत दिलास मिळेल कोरोनामुळे शेतकऱ्यांचा उभा  भाजीपाला सडून गेला आता कापूस सडण्याच्या मार्गावर आहे तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी  अशी मागणी  भाजपा जिल्हासरचिटणीस सर्जेराव तात्या तांदळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा विद्यार्थी आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ सानप यांनी केली आहे. 


No comments