Breaking News

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई द्या:- राजेंद्र आमटेअन्यथा शिवसंग्राम शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल

बीड : भारतीय अर्थव्यवस्था चा शेती हा कणा मानला जातो भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे भरडला जात आहे.खते, बी-बियाणे या साठी लाखो रुपये खर्चूनही उत्पादन चांगले आले असताना शेतकऱ्याच्या तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. शेतकऱ्याच्या कापसाला व उसाला यंदा चांगले उत्पन्न होईल अशी आशा असताना अचानक निसर्गाने घात केला अतिवृष्टी व वारे यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभे असणारे ऊस, कापूस या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

 

ऊस भुईसपाट झाला आहे व कापूस चे बोंड सडायला सुरवात झाली आहे.केंद्र व राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना अतिवृष्टी चे नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात हवे किमान शेतकऱ्यांना आधारभूत दिलास मिळेल कोरोनामुळे शेतकऱ्यांचा उभा  भाजीपाला सडून गेला आत्ता कापूस सडण्याच्या मार्गावर आहे तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी  अशी मागणी  आ. विनायकराव मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी राऊत साहेब यांना निवेदन  जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, सरचिटणीस सुहास पाटील, जेष्ट नेते सचिन बाप्पा कोठुळे, अक्षय माने, प्रशांत डोरले, जितेंद्र शिंदे,अमोल शिंदे,संतोष आमटे आदींच्या वतीने निवेदन देण्यात आले


   

No comments