Breaking News

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपये अनुदान द्या- परजणे


आमदार बाळासाहेब आजबे यांच्याकडे 
मनसेचे तालुका अध्यक्ष सचिन  परजने यांची निवेदनाद्वारे मागणी 

शिरूर का. : शिरूर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन परजणे यांनी आमदार बाळासाहेब आजबे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केलीय. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शिरूर कासार तालुक्यामध्ये गेल्या महिना भरापासून अतिवृष्टी झाली असून कापूस, मूग, बाजरी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे तालुक्यातील बळीराजा हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे प्रशासनाद्वारे मंडळ अधिकारी, तलाठी यांचे मार्फत पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकासन भरपाई म्हणून  प्रति हेक्टर 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे. अशी मागणी शिरूर कासार येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सचिन परजने यांनी आमदार बाळासाहेब आजबे यांच्याकडे केली आहे.


No comments