Breaking News

30 तारखे पर्यंत विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षा काळ असल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करू नये-शिवकुमार केदारी परळी :  सद्यस्थितीत  परळी शहरात वारंवार व दीर्घकाळ वीज पुरवठा खंडित होत आहे. सध्या उच्च शिक्षणा पर्यंत च्या सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरू आहेत. परीक्षा काळात सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.  अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा व पालकांचा गोंधळ उडतो आहे. महावितरण कंपनीने महावितरण कंपनीने सुरळीत वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार केदारी यांनी अतिरिक्त आभियंता परळी वैजनाथ व जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली आहे.

    या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वीज पुरवठा बराच काळ खंडीत राहिल्यामुळे इंटरनेट/Wifi कनेक्शन वर ही परिणाम होत आहे. ते ही जास्त कालावधीच्या विद्युत पुरवठया अभावी व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे विद्यार्थी जास्त अडचणीत येत आहेत. आधीच कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे.

  व त्यात त्यांनी ऑनलाईन घेतलेल्या शिक्षणाचीही ते नीट परीक्षा  देऊ शकत नाहीत. यामुळे त्यांचे पूर्णत: नुकसान होत आहे . विद्यार्थ्यांची अवस्था  "आई खायला देईना व बाप भीक मागू देईना"अशी बिकट होत आहे.  30 आक्टोबर 2020 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे  विद्युत पुरवठा अखंडीत सुरूच रहावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे मा. अतिरिक्त  अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, परळी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते  शिवकुमार केदारी यांनी केली आहे.


No comments