Breaking News

धनको आणि ऋणको दोन्ही सक्षम नसतांना वैद्यनाथ कारखान्याला डीसीसीचे 25 कोटींचे बोगस कर्ज !

 


संचालक चंद्रकांत शेजुळ यांनी घेतला आक्षेप, डी.डी.आर. यांनी केला पंचनामा  

कोरम पुर्ण नसतांना ठराव केला पारित बैठकीला फक्त दहाच सदस्य 

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही मागील काळात कर्जदारांसाठी वरदान तर  गुंतवणुकदारांसाठी कर्दनकाळ ठरलेली असतांना तसेच अजुनही कुठल्याच दृष्टीकोणातुन बॅंक सक्षम नसतांना देखील 229 कोटींच्या तोटयात असलेल्या वैद्यनाथ कारखान्याला   25 कोटींचे बोगस कर्ज देण्यासाठी कोरम पुर्ण नसतांना घेतलेल्या बोगस सभेवर संचालक चंद्रकांत शेजुळ यांनी आक्षेप घेतला असुन कोरमबाबत तसेच संचालकांच्या उपस्थिती बाबत जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी पंचनामा केला असुन धनको म्हणजेच जिल्हा बॅंक आणि ऋणको म्हणजेच वैद्यनाथ कारखाना दोन्ही सक्षम नसतांना हे बोगस कर्ज दिले जात असल्याचा देखील आरोप शेजुळ यांनी केला आहे. 

शेतक-यांची बॅंक म्हणुन ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला मागील दहा बारा वर्षांच्या काळात मोठेच ग्रहण लागलेले आहे. मोठया प्रमाणात झालेल्या बोगस कर्जांमुळे मागील काळातील अनेक पदाधिकारी व संचालकांना जेलची हवा खावी लागल्याची उदाहरणे अजुन निपटलेली नाहीत. असे असतांना केवळ वैद्यनाथ कारखान्याला 25 कोटीचे कर्ज देण्यासाठी दि. 16 आॅक्टोबर रोजी संचालकांची सभा बोलावण्यात आली होती मात्र कोरम पुर्ण न झाल्याने ती रदद करण्यात आली.

 त्यानंतर 19 आॅक्टोबरला कळवुन 20 आॅक्टोबरला अचानक सभा बोलावण्यात आली व ती देखील बॅंकेच्या इतिहासातील सर्वसामान्य वेळ म्हणजेच दुपारी 1 ऐवजी सकाळी 11 वाजताच बोलावण्यात आली. यावेळी कोरम पुर्ततेची कसलीही पर्वा न करता घाईगडबडीने इतर सामान्य विषय पटापट निपटुन वैद्यनाथ कारखान्याच्या कर्जाचा विषय घेण्यात आला त्यावर संचालक चंद्रकांत शेजुळ यांनी बॅंक अशा कर्जासाठी सक्षम नसल्याचे तसेच अशी कर्जे ज्या ज्यावेळी बॅंकेने दिली ती परत न आल्याचे निदर्शनास आणुन दिले व त्यावर आक्षेप घेतला तसेच सभेसाठीचे सर्व नियम धाब्यावर बसवुन ही सभा उरकली जात असल्याचे देखील त्यांनी निदर्शनास आणुन  दिले परंतु यावर लक्ष न देता बॅंकेचे अध्यक्ष हे उपस्थितीपट घेवुन तेथुन निघुन गेले  अशा परिस्थितीत शेजुळ यांनी जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांना पंचनाम्याची विनंती केली त्यानुसार फडणीस यांनी सकाळी 11ः45 ला पंचनामा केला त्यात त्यांनी बॅंकेचे प्रभारी मु.का.अ. शरद ठोंबरे यांना उपस्थिती पट मागीतला असता त्यांनी तो अध्यक्षांकडे असल्याचे सांगीतले तसेच अध्यक्षांना दुरध्वनीद्वारे याची विचारणा केली असता त्यांनी पट माझयाकडे असुन मी बाहेरगावी आल्याचे उत्तर दिले तसेच दुपारी दीड वाजेपर्यंत उपस्थिती पट पहावयास मिळाला नसल्याचा पंचनामा त्यांनी केला त्यामुळे बॅंकेत एकच खळबळ पहावयास मिळत होती. 

दरम्यान शेतक-यांचे डिपाॅझीटचे पैसे देण्यासाठी बॅंकेकडे पैसा नाही, शासनाचे कर्जमाफीच्या आलेल्या 350 कोटींपैकी 100 कोटी देखील अजुन बॅंकेने वाटले नाहीत  दर बैठकीला डिपाॅझीटर हे रांगालावुन पैसे परत करण्याची मागणी करतात मग अशा वेळी कुठल्याच परिस्थितीत परतफेडीसाठी सक्षम नसलेल्या वैद्यनाथ कारखान्याला 25 कोटीचे कर्ज देवुन बॅंकेचे अध्यक्ष आदित्य सारडा हे जिल्हा बॅंकेला  पुन्हा गर्तेच्या खाईत लोटण्याचा खटाटोप करीत असल्याचा देखील आरोप शेजुळ यांनी केला असुन गर्तेच्या खाईकडे पुन्हा वाटचाल करणारी बॅंक वाचविण्याचे देखील त्यांनी यावेळी आवाहन केले आहे.


No comments