पारधी वस्तीवर सामुहिक हल्ला प्रकरणी 21 आरोपींचा अटपुर्व जामिन फेटाळला
अविनाश इंगावले । गेवराई
तालुक्यातील खांडवी येथे वास्तवित असणा-या पारधी वस्तीवर लहान मुलांच्या कारनावरूण सामुहिक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी २४ आरोपी विरोधात अॅट्रासिटी सह अन्यकलमान्वे गून्हा दाखल असुन या प्रकरणात आतापर्यंत बीड जिल्हा सत्र न्यायलयाने २१ आरोपीचा अटकपुर्व जामिन फेटाळला आहे.
खांडवी या ठिकाणी सामुहिक रित्या २४ जनांनी पारधी वस्तीवर हल्ला केला होता या प्रकरणी गुन्हा दाखल असुन एक आरोपी पोलीसांच्या ताब्यात आहे आणि ईतर सर्व आरोपी फरार आहेत आरोपीनी आपल्याला अटकपुर्व जामिन मिळण्याकरिता जिल्हा सत्र न्यायालय बीड येथे अटकपुर्व जामिन साठी वेगवेगळा अर्ज मांडला होता आतापर्यंत २१ आरोपी यांच्या अटक पुर्व जामिन न्यायलयाने फेटाळून लावला आहे पिडीत यांच्यावतीने सामाजिक न्याय अभीयानाचे अॅड सिदार्थ शिंदे यांनी भक्कम बाजू मांडली आहे.
No comments