Breaking News

शिवसंग्राम उपोषण: जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध 133 नुसार नोटीस काढण्याचे एसडीएम यांना आदेश

शिवसंग्राम शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले

बीड :  शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायकराव मेटे यांच्या सुचनेनुसार बीड शहरातील जनतेची रस्त्याची कामे जाणीवपूर्वक अडवल्याने होणाऱ्या त्रासातून सुटका व्हावी यासाठी शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड विभागप्रमुख दत्ता गायकवाड यांनी परवापासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केलेले आहे. काल रात्री जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावर यांनी शिवसंग्राम शिष्टमंडळाचे ऐकून घेत एसडीएम यांना याबाबत कसलीही कारवाई आतापर्यंत न करणाऱ्या बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री उत्कर्ष गुट्टे व कंत्रातदारांवर कारवाई करण्याचे व 133 नुसार नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत. 

      तब्बल 2 दिवस झाले उपोषण सुरू असून आजही रस्त्याचे काम सुरू नाही केल्यास ते सुरू राहणार आहे. यावेळी शिवसंग्राम शिष्टमंडळामध्ये सरचिटणीस तथा बीड शहर प्रभारी अनिल घुमरे, सुहास पाटील, विनोद कवडे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, स्वीय सहायक धनंजय गुंदेकर यांचा समावेश होता.
No comments