Breaking News

वैद्यनाथ बँकेचा चेअरमन 10 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलापरळीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ; सहकार क्षेत्रात खळबळ

परळी  :  सहकार क्षेत्रात अग्रणी समजल्या जाणाऱ्या परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेचा चेअरमन अशोक जैन याला  10 लाख रुपयाची लाच स्वीकारताना  रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने परळीत केली. या कारवाईने संपूर्ण सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 

 कळंब येथील एका व्यापाऱ्यास बँकेतून  अडीच कोटी रुपयाचे कर्ज मंजूर करण्यासाठी वैद्यनाथ बँकेचा चेअरमन अशोक जैन याने तक्रारदार यांच्याकडे पंधरा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी (दि.19) 10 लाख व उर्वरित 5 लाख रुपये नंतर देण्याचे  ठरले होते. त्यानुसार तक्रारदाराकडून चतुर्भुज अशोक जैन 10 लाख रुपयांची लाच स्वीवकारतांना एसीबीने रंगेहाथ पकडलं. 

 ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद  सापळा अधिकारी, पोलीस निरीक्षक  गणेश धोक्रट, पोलीस नाईक विजय  ब्रह्मंदे, सुनील पाटील, मिलिंद इप्पर, पोलीस शिपाई विलास चव्हाण, चांगदेव बागुल, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद  मार्गदर्शक-  डॉ.राहुल खाडे, पोलिस अधीक्षक,  डॉ. अनिता जमादार अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र. वि. औरंगाबाद यांनी  केली.No comments