Breaking News

1 नोव्हेंबर पासून ऑनलाईन महारोजगार मेळावा



बीड :  महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, औरंगाबाद या कार्यालयामार्फत दिनांक 1 नोव्हेंबर 2020 ते दिनांक 7 नोव्हेंबर 2020 या कालावधीत ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यासाठी, जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद, अभिजय ऑटोपार्टस प्रा.लि. औरंगाबाद, आकार ऑटो इंडस्टीज लि. औरंगाबाद, चौगुले इंडस्टीज प्रा.लि. पुणे, महावितरण कार्यालय, औरंगाबाद, मुख्य जीवन विमा सल्लागार प्राधिकरण, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, सेक्युरिटी ॲण्ड इंटेलिजन्स सर्विसेस इंडिया लि. गोवा, रक्षा सेक्युरिटी फोर्स, हिंगोली, विराज प्रोफाईल लि. पालघर, श्री. गुरुकृपा इंजिनिअरिंग वर्क्स, उस्मानाबाद, धूत टान्समिशन औरंगाबाद, महिंद्रा स्टील सर्व्हीस लि. पुणे, एनआरबी बेअरिंग, औरंगाबाद, ॲसेसीव्ह एज्युकेशन लि. पुणे व श्री साई रिसर्च लॅब इ. नामांकित उद्योजकांनी 1902 ऑनलाईन रिक्त पदे अधिसुचित केलेली आहेत.

एस.एस.सी, एच.एस.सी, आय.टी.आय, पदवीधर, डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीधर, एम.बी.ए. इत्यादी पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. सदर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना आपल्या एम्पलॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉगईन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे व ज्यांची नोंदणी नाही त्यांनी नोंदणी करुन अप्लाय करावे.

याबाबत काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वणी क्रमांक 0240-2334859 वर संपर्क करावा तसेच जॉब व्हॅकेंसीज बाबत दररोज माहिती अपडेट करण्यात येते तरी उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघावी असे आवाहन अ.भि.पवार, उपआयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, औरंगाबाद यांनी केलेले आहे.



No comments