Breaking News

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार हनुमंत मंत्रे यांना प्रदान


जगदीश गोरे । धारूर 
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने प्रत्येक वर्षी देण्यात येणाऱ्या "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार" या वर्षी पहाडी पारगाव येथील शिक्षक हनुमंत बळीराम मंत्रे यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला. 

हनुमंत मंत्रे हे पहाडी पारगावचे सुपुत्र असुन ते जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धारूर येथे कार्यरत आहेत त्यांनी या आधी पहाडी पारगाव,कारी या ठिकाणी ही उत्कृष्ट कार्य  केले आहे ग्रामीण भागातुन शिक्षण घेऊनच तेही शिक्षक झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अडीअडचणीची जान आहे.शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे व स्वाताहाला वाहुन घेणारे हे व्यक्तिमत्त्व.विद्यार्थ्यांच्या प्रती सदैव जिव्हाळा,आपुलकी,प्रेम त्यामुळे विद्यार्थ्यांचेही ते आवडते शिक्षक म्हणून पाहिले जाते अतिशय शांत,संयमी, मितभाषी व एक हाडाचा शिक्षक आपल्या कार्य प्रती सदैव तत्पर असणारे व कोव्हीड-19या आपत्तीजनक परस्थीतित उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी, नागरिक हे या जिवनात यशस्वी झाले आहेत या सेवेच्या सन्मानार्थ 'महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या' वतीने देण्यात येणारा या वर्षी चा "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार" हनुमंत मंत्रे यांना देण्यात आला आसल्याने त्यांच्यावर या डोंगरपट्टयासह तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments