Breaking News

कोयत्याला मिळणार न्याय; ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवावा - पंकजा मुंडे

शरद पवार यांच्याशी करणार चर्चा  पंकजा मुंडे यांनी केलं ट्विट 
बीड : यंदा ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरून संघटना आक्रमक झाल्या असून कोयत्याला  न्याय, ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवावा असं ट्विट माजी महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी करत माजी केंद्रीय कृषी मंत्री  शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी त्यात म्हटलं आहे. 

ऊसतोड मजूर व ठेकेदारांना दर वाढ देण्यात यावी. यासह विविध मागण्या दरवर्षी ऊसतोड कामगारांच्या संघटना च्या वतीनं आंदोलन संप पुकारला जातो. परंतु त्यांच्या मागणीची नेहमीच टोलवा- टोलवी करून अश्वासनांवर त्यांची बोळवण केली जाते. यंदा मात्र कोरोना महामारीमुळे गत सहा महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे मजुरांच्या हाताला कामे नसल्यानं मजूर वर्ग हतबल झाला होता. त्यातच ऊसतोडीचा हंगाम सुरू होत असून गाडी मालक- साखर कारखान्यांकडून ऊसतोड मजुरांना आणखी उचल देण्यास सुरवात झालेली नाही. 

दरम्यान ऊसतोड कामगार व ठेकेदारांना दर वाढ देण्यासाठी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असून दरवाढीची मागणी जोर धरू लागली असताना भाजपाच्या तथा ऊसतोड मजुरांच्या राज्यातील नेत्या पंकजा मुंडे यांनी कोयत्याला मिळेल न्याय ;  ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवावा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कारखानदारांचे प्रतिनिधी जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष दांडेगावकर यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे  मुंडे यांनी सांगितले आहे.  त्यामुळे यंदा तरी ऊसतोड मजुरांच्या प्रश्न मार्गी लागणार का हा प्रश्न असून  पंकजा मुंडे शरद पवार यांच्यात चर्चा होऊन कामगारांना न्याय मिळेल काय याकडे  ऊसतोड कामगार, मुकादमांचे लक्ष लागले आहे. 

No comments