Breaking News

ना. धनंजय मुंडे यांनी फोनवर उपोषणार्थींशी संवाद साधताच उपोषण मागे

माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि आ. संजय दौंड यांची मध्यस्ती कामी आली

गौतम बचुटे । केज 
बीड जिल्ह्यातील पाथरा ता. केज येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जातीच्या आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांवर संथाचालक आणि प्रशासना कडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात दि.२ सप्टेंबर २०२० पासून कर्मचारी त्यांचे कुटुंबीय व लहान चिलीपिली ही ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता आपल्या न्याय हक्कासाठी तीन दिसपासून उपोषणाला बसले होते. त्याची माहिती माहिती माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी उपोषणार्थींची भेट घेऊन थेट समाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना धनंजय मुंडे यांना दिली. तसेच आ. संजय दौंड यांनीही सर्व माहिती पालक मंत्र्यांना कळविली होती. त्या नुसार धनंजय मुंडे यांनी वरीष्ठ पातळीवरून अधिकारांना आदेश दिले. त्यामुळे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी रात्री १०:०० वाजता समाज कल्याण सहाय्यक उपायुक्त डॉ. सचिन मडावी, तहसीलदार दुलाजी मेंढके यांना आदेश देताच व स्वतः उपोषणार्थींशी फोनवरून चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती करताच तीन दिवसापासून सुरू असलेले कर्मचारी व त्यांचे नातेवाईक यांनी रात्री आपले उपोषण मागे घेतले.


पाथरा येथे दि.२ सप्टेंबर पासून आश्रमशाळेत कर्मचारी हे सुरुवाती पासून कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांनाच शाळेची संच व वैयक्तिक मान्यता देण्यात यावी. संस्थेची सर्व अभिलेखे तपासणी कामी कार्यालयाने हस्तगत करावीत. संस्थाप्रमुख यांच्यावर कार्यवाही करुन सदरील कर्मचाऱ्यांचे नियुक्तीचे आदेश देण्यात यावे. हे प्रकरण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयीन स्तरावर येत नसेल तर ज्या कार्यालयाच्या अधिकार कक्षात येते त्यांना कळवावे. अंतिम निर्णय लागत नाही तो पर्यंत संस्थेला आलेल्या संच मान्यता व वैयक्तिक मान्यता प्रस्तावर निर्णय घेण्यात येवु नये. तसेच निर्णय लागे पर्यंत शाळेच्या सर्व प्रशासकीय कामकाजावर प्रतिबंध लावण्यात यावा. मा. धर्मादाय आयुक्त यांच्या मार्फत संस्थेची चौकशी करुन संसंस्थेचे कार्यकारी मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमण्यात यावा. तसेच या प्रकरणाची सुनावणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्र्यांच्या दालनात घेण्यात यावी. अशा आठ मागण्यासाठी संस्थेचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय सौ. उषा अमरसिंग कदम, सौ. नमिता संजय बनसोडे, सौ. छाया सतिश सातपुते, सौ. संध्या अमोल सोनवने, सौ. वदना संजय सोनवणे, सौ. सुनिता परमेश्वर कांबळे, सौ. शितल संभाजी कांबळे, संजय मारुती सोनवणे, परमेश्वर ईश्वर कांबळे आणि लहान मुले चि. सार्थक संजय बनसोडे, चि. राजवीर संभाजी कांबळे असे एकूण एकराजण तीन दिवसा पासून उपोषण सुरू होते.

दरम्यान दि.४ सप्टेंबर रोजी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी उपोषणाला भेट देऊन सर्व परिस्थिती ना धनंजय मुंडे यांना कळविली. तसेच संबंधित अधिकारी यांना संपर्क साधला. त्या नंतर ना धनंजय मुंडे यांच्या आदेशा नुसार हालचाली झाल्या व त्यानीही स्वतः फोनवरून उपोषणार्थीशी संवाद साधून मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच समाजकल्याण अधिकारी आणि न्यास नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधला. त्या प्रमाणे रात्री १०:०० वाजता तिसऱ्या दिवशी समाजकल्याण उपायुक्त डॉ. सचिन मडावी त्यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले. यावेळी तहसीलदार दुलाजी मेंढके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, सपोनि विजय आटोळे व पत्रकार गौतम बचुटे आणि मनोराम पवार हे उपस्थित होते.

3 comments: