Breaking News

मोरदरा, शांतीवनच्या पर्यटन स्थळाला मिळणार अधिकचा निधी !

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मागणीला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा सकारत्मक प्रतिसाद

बीड :  मोरेश्वर मंदिर मोरदार व युवा शांतीवन मंजेरी येथील पायाभूत सुविधा व निसर्ग वन पर्यटन विकास कामे करण्यासाठी अधिकचा निधी देण्यात यावा अशी मागणी आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कडे केली,शांतीवन व मोरदार यासह बीडच्या पर्यटनासाठी अधिकचा निधी दिला जाईल असा सकारत्मक प्रतीसाद पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

बीड पासून काही अंतरावर युवा शांती वन मंजेरी येथे आहे, वन विभागाच्या वतीने याठिण अनेक कामे सुरू आहेत.याठिकाणी  जिल्हा नियोजन सह पर्यटन विकासच्या माध्यमातून काही कामे सुरू आहेत, याची पाहणी आमदर संदीप भैय्या क्षीरसागर यांनी केल्यानंतर अर्धवट व नव्याने विकास कामे करण्यासाठी आराखडा बनवण्याच्या सूचना उपविभागीय वन अधिकारी श्री तेलंग यांना दिल्या होत्या.त्याच बरोबर मोरेश्वर मंदिर मोरदार परिसरात विकास कामे करण्या माहिती घेतली होती, मोरदार व शांतीवन येथील सुरू असलेली कामे व नव्याने करावयाच्या कामासाठी आमदर संदीप भैय्या क्षीरसागर यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निधी मागणीचे पत्र दिले.पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सकारत्मक प्रतिसात दिल्याने या दोन्ही प्रकल्पाला अधीकचा निधी मिळणार असल्याचे दिसते.

करोनाच्या संकट काळात विकास कामांसाठी आ. संदीप भैय्या प्रयत्नशील

करोना या संकट काळातही आमदर संदीप भैय्या क्षीरसागर बीड मतदारसंघातील विकास कामांसाठी प्रयत्न करत असताना दिसत आहेत,मतदारसंघातील आरोग्याचे ,रस्त्यांचे व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयातील मंत्री महोदय अधिकारी वर्ग यांच्या भेटी घेतांना ते दिसत आहेत.

No comments