Breaking News

शिरूर बसस्थानकातून ज्यादा बस सोडाव्यात, प्रवाशांमधून होतेय मागणी


बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार

लॉकडाऊनमुळे बंद झालेली बससेवा अजूनही सुरळीतपणे सुरू झालेली नाही. शिरूर शहरातून फक्त बीड ते पुणे, बीड ते कल्याण आणि माजलगाव ते मुंबई या तीनच बस जात असल्याने फक्त तीनदा शिरूरकरांना बसचे दर्शन होते. प्रवाशांची मागणी आणि गैरसोय लक्षात घेऊन आणखी काही बस सुरू करण्याची गरज आहे. 
प्रतिकात्मक


लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळाची बस सेवाही बंद झाली होती. अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी शासनस्तरावरून काही गोष्टींना परवानगी देण्यात येत आहे.राज्य परिवहन महामंडळाने ही लांब पल्ल्याच्या काही बस सुरू केल्या आहेत. शिरूर येथून जाणाऱ्या बीड ते पुणे, बीड ते कल्याण आणि माजलगाव ते मुंबई या तीन बस सुरू झालेल्या आहेत.प्रवाशांच्या गैरसोय आणि मागणीचा विचार करून आणखी काही बस सेवा सुरू करण्याची गरज आहे.
पाटोदा ते औरंगाबाद ही लांब पल्ल्याची बस डोंगरकिन्ही,जाटनांदूर, सिंदफणा, शिरूर, बोधेगाव मार्गे चालू करणे आवश्यक आहे. प्रवासाच्या अडचणी लक्षात घेऊन बीड ते शिरूर, बीड ते पाथर्डी, बीड ते नगर या गाड्याही सुरू करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांत होत आहे.

No comments