Breaking News

शिवसेनेच्या महिला रणरागिणींकडून कंगणाच्या निषेधार्थ काढली अंत्ययात्रा


घोषणाबाजी करत पुतळ्याचे केले दहन
बीड :  महाराष्ट्र व मुंबई पोलीस यांची दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करून बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत यांच्या पुतळ्याची शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिनींकडून अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त करण्यात आले असून कंगणाविरूद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारे घोषणाबाजी करत पुतळ्याचे दहन करण्यात आले.


शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. संगिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बीड  शहरामध्ये कंगणा रनौत हिच्या पुतळ्याची अत्यंयात्रा काढण्यात आली. योवळी बोलतांना अ‍ॅड. चव्हाण म्हटल्या की, महाराष्ट्राच्या पावन भूमीत बाहेरुन आलेल्या आणि कलेच्या नावावर नंगानाच करत करोडो रुपये कमवणार्‍या तसेच स्वयंघोषित मोठी अभिनेत्री असल्याचा आव आणणार्‍या कंगना रनौत हिने तिच्या अकलेचे दिवाळे काढत मला मूव्ही माफिया आणि गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज असं तिनं म्हटलं होतं. तसेच मला मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटतेय असे सांगून महाराष्ट्रद्रोह केला आहे. अशा महाराष्ट्रद्रोही असलेल्या कंगनाचाही एकही चित्रपट आम्ही प्रदर्शित होवू देणार नाही. तसेच तिच्या एकाही चित्रपटाचे चित्रीकरण सुध्दा होवू देणार नाही. मुंबई बाहेरच्या कोणीही एैर्‍यागैर्‍यानी येवून मुंबईला आणि महाराष्ट्राला नाव ठेवण्याचा प्रयत्न करु नये. मुंबईला नाव ठेवणे म्हणजेच महाराष्ट्र द्रोह असून अशा महाराष्ट्र द्रोह्यांना राज्यात राहण्याचा अधिकार नाही अशा इशारा दिला. अत्ययात्रेत व पुतळा दहन प्रसंगी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण, उपजिल्हा प्रमुख फरजाना शेख, शांता राऊत, शामल पवार, सारिका काळे, रेखा वाघमारे, संगिता वाघमारे,  सारिका डोंगरे, भागिरीथी जाधव, लक्ष्मी गुरूकूल यांच्यासह आदी शिवसेना महिला आघाडीच्या रणरागिणी उपस्थिती होत्या. 

No comments